लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : केंद्राच्या कृषीविधेयक धोरणाच्या समर्थनासाठी विरोधी पक्षनेते भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात दौरा केला. यावेळी गट तट बाजूला ठेऊन नेते एकवटले होते. आता शरद पवार यांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा बळ आले आहे.
युती शासन असताना इस्लामपूर शिराळा
मतदारसंघातील राजकीय हवा भाजपच्या नेत्यांनी टाईट केली होती. तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपले राजकीय बळ वापरून राष्ट्रवादी अर्थात जयंत पाटील यांचा कार्यक्रम आखला होता. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे मोहरे टिपण्याची खेळी केली. यामध्ये राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे माजी उपसभापती विशाल शिंदे, इस्लामपूर नगरीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा भाजप प्रवेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित घेऊन राष्ट्रवादीला धक्का दिला.
विधानसभा निवडणुकीनंतर इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात राजकीय हवाच बदलली. शिराळ्यात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला; तर सत्यजित देशमुख यांचा पक्षप्रवेश भाजपच्या वाजबाकीचा ठरला. त्यातच महाडिक बंधूचा भाजप प्रवेश बेरजेचा ठरेल, असे वाटत असतानाच तिन्ही गटात असलेला अंतर्गत संघर्ष राष्ट्रवादीसाठी बळकटी देणारा ठरत आहे.
शरद पवार यांच्या दौऱ्यात भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांची उपस्थिती भाजपच्या कार्यकर्त्यांना संभ्रमात पाडणारी होती तर दुसरीकडे मात्र वाळवा शिराळ्यात रयत क्रांती संघटना आणि महाडिक गट भाजपचा झेंडा घेऊन विविध कार्यक्रमात व्यस्त होते.
फोटो शरद पवार, जयंत पाटील, मानसिंग नाईक