कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बुधगाव व माधवनगर येथे बुधवारी बैठका झाल्या. त्यावेळी तहसीलदार कुंभार बोलत होते. ते म्हणाले, शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. आता आपत्ती व्यवस्थापन समितीने अधिकारांचा पुरेपूर वापर करून निर्बंधांची अंमलबजावणी करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत व्हावे. जादाचे मनुष्यबळ उपलब्ध करून प्रशासकीय यंत्रणा विशेषत: आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करावा.
बुधगाव येथील बैठकीला सरपंच सुरेश ओंकारे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील, शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, डाॅ. मंदाकिनी नागरगोजे, ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे, तलाठी गणेश गायकवाड, अनिल डुबल, प्रशांत मोहिते, सतीश खांबे, तर माधवनगरच्या बैठकीला सरपंच अनिल पाटील, देवीलाल बागल, दिलीप खाडे, सुरेश मालाणी उपस्थित होते.
चौकट
वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशीच ड्युटीवर!
बुधगाव आयुर्वेदिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी मंदाकिनी नागरगोजे यांच्या वडिलांचे मंगळवारी निधन झाले, तरीही त्या बुधवारी रुग्णालयात कार्यरत होत्या. दु:ख बाजूला ठेवून सेवेत कार्यरत राहणाऱ्या डाॅ. नागरगोजे यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.
बुधगावात दोन दिवसांनंतर स्वयंस्फूर्तीने आठवडाभर कडक बंद पाळण्याचा विचार यावेळी मांडण्यात आला.