लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: शिराळा तालुक्यात वीकेंड लाॅकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवारीही किराणा दुकाने बंद होती, एसटी सेवा प्रवासी नसल्याने ही अत्यावश्यक सेवा असूनही बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
तालुक्यात सर्व गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यात येत होती.
वाहनांची तपासणी करण्यात येत होती.
तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल आदींनी पहाणी केली.
शिराळा शहरातील सर्व व्यवसाय पूर्ण बंद होते. सोमवार पेठ, कुरणे गल्ली, लक्ष्मी चौक, एस. टी. स्टॅड परिसरात शुकशुकाट होता. शेडगेवाडी, आरळा, कोकरूड, चरण, मांगले, सांगाव, चिखली, शिरशी, वाकुर्डे आदी सर्व गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता १०० टक्के व्यवहार बंद होते. नागरिकही घराबाहेर पडत नव्हते. प्रवासी नसल्याने बससेवा पूर्णपणे बंद होती.