शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सांगलीच्या उपनगरांत जगण्याचा संघर्ष कायम- मदत वाटपावेळी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:24 AM

या महापुराचा सर्वाधिक फटका शहरातील उपनगरांना बसला. दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, इंद्रप्रस्थनगर, मीरा हौसिंग सोसायटी, कलानगर या उपनगरांतील पूर्ण घरेच पाण्याखाली गेली होती. तब्बल पावणेदोन लाख लोकांना महापुराचा फटका बसला.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर : घरांच्या ओल्या भिंतींना अजूनही कुबट वास

सांगली : महापुराच्या धक्क्यातून आता सांगली शहर हळूहळू सावरू लागले आहे. पुरामुळे नागरी वस्तीचे मोठे नुकसान झाले होते. विशेषत: उपनगरात राहणाऱ्या गोरगरीब जनतेला पुराचा मोठा दणका बसला होता. आता पंधरा दिवसांनंतर उपनगरांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. स्वच्छता, कचरा उठाव बºयापैकी झाला असला तरी, भिंती ओल्याच असल्याने घरात अजूनही दुर्गंधी आहे. काही भागात कचºयाचे ढीग रस्त्यावर पडून आहेत, तर काही ठिकाणी अपेक्षित औषध फवारणी झाली नसल्याच्या तक्रारी आहेत.

आॅगस्टच्या पहिल्याच आठवड्यात कृष्णा नदीला महापूर आला. २००५ च्या पुराचा अनुभव गाठीशी असलेल्या सांगलीकरांनी त्यानुसार नियोजन केले. पण शतकाला सर्वात मोठ्या महापुराला सामोरे जावे लागणार असल्याची पुसटशी कल्पनाही जनतेच्या मनात नव्हती. त्यात जिल्हा प्रशासनानेही पाण्याची पातळी किती वाढणार, याची माहिती जनतेला दिली नाही. केवळ वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून, खबरदारी घ्या, असे सांगून हात झटकले होते. नेमकी काय खबरदारी घ्यायची, हे कळण्यापूर्वीच लोकांच्या दारात कृष्णामाई अवतरली. त्यामुळे जनतेचा मोठा गोंधळ उडाला. हजारो नागरिक पुरात अडकून पडले होते.

या महापुराचा सर्वाधिक फटका शहरातील उपनगरांना बसला. दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, इंद्रप्रस्थनगर, मीरा हौसिंग सोसायटी, कलानगर या उपनगरांतील पूर्ण घरेच पाण्याखाली गेली होती. तब्बल पावणेदोन लाख लोकांना महापुराचा फटका बसला. त्यात उपनगरांतील लोकांची संख्या अधिक होती. महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त लोक घरी परतले, पण घरादारासमोरचा चिखल, पुरात वाहून गेलेला संसार पाहून त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. चार ते पाच दिवसांच्या परिश्रमानंतर घरातील चिखल लोकांनी बाहेर काढला. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सारेच राबत होते. पंधरा दिवसानंतर आता कुठे उपनगरांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनीत स्वच्छता झाली आहे. काही ठिकाणी कचºयाचे ढीग आहेत. दोन-तीनदा उपनगरांतील कचरा उचलला गेला. त्यानंतरही कचरा रस्त्यावर येतच आहे. कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात कचºयाचा ढीग आहे.

औषध फवारणीबाबत काही नागरिकांच्या तक्रारी दिसून आल्या. सुरूवातीच्या काळात एकदाच औषध फवारणी झाली. त्यानंतर आठ दिवसांनी फवारणी झाल्याचे सांगण्यात आले. शासनाची मदतही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. महापालिकेकडून कीट वाटप सुरू केले आहे. पण पुरामुळे घरातील ओलावा काही हटलेला नाही. घराच्या भिंती अजूनही ओल्याच आहेत. त्यामुळे घरात कुबट वास येत आहे. अजूनही काही घरात स्वच्छतेचे काम सुरूच असल्याचे चित्रही उपनगरांत दिसून येते. उपनगरांत मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यात शासनाने पाच हजाराची मदत केल्याने त्यांना थोडाफार हातभार लागला आहे. अजूनही अनेकजण मजुरीसाठी बाहेर पडलेले नाहीत.मदत वाटपातही नेत्यांकडून श्रेयवादपूरग्रस्त उपनगरांत सध्या महापालिकेच्यावतीने साहित्याच्या कीटचे वाटप केले जात आहे. महापालिकेतील अधिकाºयांचे पथक उपनगरात जाऊन स्वत: कीट वाटत आहे. पण कीट वाटप करताना त्या भागातील लोकप्रतिनिधी मात्र वारंवार हस्तक्षेप करीत आहेत. त्यांच्यामुळेच मदत मिळत असल्याचे लोकांच्या मनावर बिंबविण्याचा केविलवाणा प्रयत्नही सुरू झाला आहे. रविवारी हरिपूर रस्त्यावर कीटचे वाटप करताना मोठा गोंधळ उडाला. ५०० हून अधिक लोक कीटसाठी रांगेत उभे होते. गोंधळामुळे अखेर आयुक्त नितीन कापडणीस यांना घटनास्थळी जावे लागले. त्यांनी लोकांची समजूत काढून, अजून कीट वाटली जाणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जनतेचा संताप कमी झाला.पूरग्रस्त शाळा : अजूनही बंदचमहापालिकेसह खासगी शाळांनाही पुराचा मोठा फटका बसला आहे. उपनगरांतील अनेक शाळा पाण्याखाली होत्या. या शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. सोमवारपासून त्या सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मुलांचे शालेय साहित्यही पुरात खराब झाले आहे. या मुलांना महापालिकेच्यावतीने पुस्तके व शालेय साहित्य दिले जाणार आहे. पण शाळाच बंद असल्याने त्यांचे वाटपही पूर्णपणे होऊ शकलेले नाही. उपनगरांतील मुलांना मात्र आता शाळेची ओढ लागली आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर