फोटो ०१ संतोष ०१
सांगली आगारात एसटी बसेस अशा रांगेत लावून ठेवल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तब्बल सव्वा वर्षांपासून एकाच जागी थांबून असणाऱ्या एसटी गाड्यांची देखभाल दुरुस्ती प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरली आहे. उत्पन्न शून्यावर आले असताना देखभालीचा खर्च मात्र सुरूच आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनचा काळ एसटीच्या जीवनमरणाची परीक्षा पाहणारा ठरत आहे. वाहतूक बंद असल्याने उत्पन्न शून्यावर आले आहे, खर्च मात्र बंद झालेले नाहीत. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कोट्यवधी रुपये द्यावे लागत आहेत. त्यातच आता थांबलेल्या गाड्यांच्या देखभालीचा खर्चही अंगावर पडत आहे. जिल्ह्यातील विविध आगारांत एका रांगेत शेकडो गाड्या थांबवून ठेवल्या आहेत. सतत थांबून असल्याने त्यांची बॅटरी खालावत आहे. ती जिवंत ठेवण्यासाठी खटाटोप करावा लागत आहे. काही गाड्या देखभालीवेळी ढकलस्टार्ट करून सुरू कराव्या लागत आहेत. सतत एकाच जागी थांबल्याने चाकातील हवा कमी होते. टायरवर एसटीचा बोजा अखंड पडत राहतो, त्यामुळे टायरदेखील झिजत राहतात. त्यामुळे वेळोवेळी चाकांतील हवादेखील तपासावी लागत आहे. कमी झाल्यास पुन्हा भरावी लागत आहे.
इंजिनांतर्गत सुट्या भागांना तेलपाणी ठेवावे लागत आहे. एसटीसाठी हा सर्व खर्च अतिरिक्त बोजाच आहे. ऐनवेळेस गाड्या सोडण्याचा निर्णय झाला तर त्यासाठी सज्जता ठेवावी लागते, त्यामुळे देखभालीत हयगय करून चालत नाही. गाडीतून प्रवाशांची वाहतूक होणार असल्याने त्या तंदुरुस्तही राहणे गरजेचे ठरते.
चौकट
दुष्काळात तेरावा महिना
एसटीच्या कर्मचाऱ्यांचा जिल्ह्याचा महिन्याचा खर्च साडेसात कोटी रुपये आहे, उत्पन्न मात्र एक कोटीपेक्षाही कमी आहे. या स्थितीत गाड्यांची देखभाल दुरुस्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे.
पॉइंटर्स
जिल्ह्यातील आगार १०
एकूण बसेस संख्या ७६०
चौकट
सव्वा वर्षांत फक्त पाच महिने रस्त्यावर
- गेल्यावर्षी लॉकडाऊन लागताच एसटीची चाके थंडावली. तेव्हापासून एसटी पूर्ण क्षमतेने धावलेली नाही. गाड्यांचा जथ्था एसटी आगारातच थांबून आहे.
- नोव्हेंबरला लॉकडाऊन शिथिल होताच काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली. त्यानंतर एप्रिलपर्यंत कमी-अधिक प्रमाणात गाड्या धावू लागल्या. सव्वा वर्षांत फक्त पाच महिने गाड्या धावल्या.
चौकट
गाड्या धावल्या तरच जिवंत
- गाड्या रस्त्यावर धावल्या तरच त्या जिंवत राहणार आहेत. त्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा त्यांचा स्टार्टर मारला जातो. दिवे, ब्रेक आदींची तपासणी केली जाते.
- गाड्या आगाराबाहेर काढून दोन-तीन किलोमीटर फिरवून आणल्या जातात. इंजीन, चाके, ब्रेक आदीला सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे त्या भंगार होण्यापासून बचावतात.
बॉक्स
फोटो ०१ संतोष ०२
चाक पंक्चर
अनेक दिवस एकाच जागेवर गाडी थांबल्याने चाकातील हवा कमी होऊन पंक्चर झाले आहे. प्रवास सुरू होईपर्यंत ते तसेच राहील.
फोटो ०१ संतोष ०३
स्टेअरिंग तुटले
प्रवासच करायचा नाही तर स्टेअरिंगची गरजच काय? निर्बंधांमुळे ढेपाळलेल्या एसटीची अवस्था या दृश्यातून दिसते. गाडीचे स्टेअरिंग उचकटले असून केबिन धुळीने भरली आहे.
फोटो ०१ संतोष ०४
गाडी अपडेट कशासाठी ठेवायची?
गाडी वापरात नसल्याने ती अपडेट ठेवण्याची गरजच राहिलेली नाही. एका गाडीच्या बॉनेटचे कव्हर निघाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ते दोन आसनांमध्ये टाकून दिले.
कोट
गाड्या एकाच जागेवर थांबून असल्या तरी त्यांची देखभाल दुरुस्ती नित्यनेमाने केली जाते. ग्रिसिंग, तेलपाणी यावर लक्ष ठेवले जाते. गाड्या रस्त्यावर धावत नसल्याने अन्य मोडताेड फारशी नाही. वाहतूक सुरू ठेवण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून कधीही आले तरी सेवा सुरू करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे.
- अरुण वाघाटे, प्रभारी विभागीय नियंत्रक, सांगली