मिरज : मिरजेतील कन्या महाविद्यालय व बळवंतराव मराठे विद्यालयाच्या छात्रसेैनिकांनी फ्लॅग एरिया तयार करुन पाणी वाचवा हा संदेश दिला. छात्रसेैनिकांनी साकारलेल्या फ्लॅग एरियाचे उद्घाटन चंद्रशेखर मराठे यांनी केले.
छात्रसेनेच्या शिबिरात फ्लॅग एरिया हा एक महत्वाच्या भागासाठी छात्रसेैनिकांना उद्दिष्ट देऊन तयार करून घेण्यात येतो. कन्या महाविद्यालयाच्या छात्रसेैनिकांनी अलिशा मणेर हिच्या नेतृत्वाखाली पाच दिवस परिश्रम घेत माती, रंगीत दगड व रांगोळीचा वापर केला आहे. युवा शक्तीला प्रेरणा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे कॅप्टन नलिनी ढाले यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक गोखले, सचिव राजू झाडबुके, प्रभारी प्राचार्या डाॅ. शर्वरी कुलकर्णी, उपप्राचार्या मंजिरी सहस्रबुद्धे, डाॅ. सुनीता माळी, मुख्याध्यापक शशिकांत कुंभार, छात्रसेनाधिकारी जे. सी. जाधव आदी उपस्थित होते. छात्रसेनेचे कर्नल मोहन कुमार तिवारी, मेजर गुगामालती, अभिजित हिवरेकर यांनी मार्गदर्शन केले. तनुजा माळी हिने मनोगत व्यक्त केले. हर्षदा हरताळे हिने निवेदन केले. लक्ष्मी सलगर हिने आभार मानले.