शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

नाटोलीत गुरुजींच्या बदलीने विद्यार्थी धाय मोकलून रडले, व्हिडिओ व्हायरल :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 3:04 PM

विद्यार्थीप्रिय शिक्षक कसे असावेत, याचा अनुभव शिराळा तालुक्यातील नाटोली गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नुकताच आला. या शाळेचे वरिष्ठ शिक्षक वसंत शंकर कुंभार (रा. मांगले, ता. शिराळा) यांची कांदे येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून नुकतीच बढतीवर बदली झाली. याची माहिती मिळाल्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थी धायमोकलून रडले. निरोप देताना गाडीमागून चक्क पाठलाग केला, त्यांची गाडी अडवली. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थीप्रिय शिक्षक वसंत कुंभार यांनाही अश्रू अनावरजड अंत:करणाने बदलीच्या ठिकाणी जाऊन लावली हजेरी

मांगले : विद्यार्थीप्रिय शिक्षक कसे असावेत, याचा अनुभव शिराळा तालुक्यातील नाटोली गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नुकताच आला. या शाळेचे वरिष्ठ शिक्षक वसंत शंकर कुंभार (रा. मांगले, ता. शिराळा) यांची कांदे येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून नुकतीच बढतीवर बदली झाली. याची माहिती मिळाल्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थी धायमोकलून रडले. निरोप देताना गाडीमागून चक्क पाठलाग केला, त्यांची गाडी अडवली. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वसंत कुंभार गुरुजी गेल्या सात वर्षांपासून नाटोली येथील प्राथमिक शाळेत सेवा बजावत होते. नुकतीच त्यांना मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली. निरोपासाठी ते शाळेत पोहोचले. ही वार्ता अगोदरच विद्यार्थ्यांना समजली होती. गुरुजींना पाहताच विद्यार्थी रडू लागले. गुरुजींनाही अश्रू अनावर झाले. या प्रसंगातून सावरून त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांचा आणि सहकारी शिक्षकांचा निरोप घेऊन ते कांदे प्राथमिक शाळेत हजर होण्यासाठी नाटोली शाळेतून निघाले, मात्र गुरुजी बाहेर पडताच विद्यार्थ्यांनी धायमोकलून रडण्यात सुरुवात केली. मोटारसायकलपर्यंत त्यांना सोडण्यासाठी आलेले शिक्षक मागे वळून पाहतात, तर पन्नासहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी रडतच बाहेर धावले. शाळेसमोर भावूक वातावरण निर्माण झाले. गुरुजी, तुम्ही परत या अशा हाका मारत मुलांनी टाहो फोडला. त्यावेळी उपस्थित शिक्षकही भावनावश झाले.गेली सात वर्षे प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम करणाऱ्या वसंत कुंभार यांना त्यांच्या कामाची पोहोचपावती मुलांनी दिली. नवीन शिक्षक येणार, बदली होणार, हे जरी अटळ असले, तरी शैक्षणिक उठाव, अध्यापनाची हातोटी, यामुळे वसंत कुंभार विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नाटोली शाळेत काम करत होते.गुरुजींना निरोप देताना शाळेतील सर्व विद्यार्थी यावेळी धायमोकलून रडत होते. त्यातच गुरुजींनी थरथरत्या पायांनी मोटारसायकलला किक मारली. काही विद्यार्थी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून ह्यसर आम्हीही तुमच्याबरोबर येतोह्ण, म्हणून टाहो फोडू लागले. रस्त्यात थांबून गुरुजींनी त्यांची समजूत काढली. ह्यलगेच जाऊन परत येतोह्ण असे सांगत पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी कांदे मराठी शाळेत हजेरी लावली. इकडे इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून वर्गात आणले. शनिवारी नाटोली शाळेतून कुंभार गुरुजींनी निरोप घेतला, मात्र सोमवारीही विद्यार्थ्यांनी शाळेत त्यांनी फळ्यावर लिहिलेले गणित पुसू दिले नाही.

मी जाईल त्या ठिकाणी प्रामाणिक आणि सचोटीने काम केले. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन, त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. अधिक वेळ देऊन त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला. हीच माझी हातोटी विद्यार्थ्यांना भावली. शिवाय यासाठी मी मुख्याध्यापकपदाची बढती नाकारण्याचाही विचार केला होता.- वसंत कुंभार, वरिष्ठ शिक्षक

टॅग्स :Teacherशिक्षकSangliसांगलीEducation Sectorशिक्षण क्षेत्र