शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

यापुढे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 5:37 PM

सांगली जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याना जातीचा दाखला आणि गावकऱ्यांना शिधापत्रिका वितरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिली. ​​​​​​​

ठळक मुद्देयापुढे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच : जयंत पाटीलबहे, कुबालवाडी आणि खरातवाडीतील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वितरण

सांगली : जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याना जातीचा दाखला आणि गावकऱ्यांना शिधापत्रिका वितरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिली.महाराजस्व अभियान अंतर्गत वाळवा तालुक्यातील बहे येथे बहे, कुबालवाडी आणि खरातवाडी गावातील शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व शिधापत्रिका वितरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती अश्विनी पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसिलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, बहेच्या सरपंच छायाताई पाटील, खरातवाडीचे सरपंच पृथ्वीराज खरात, कुबालवाडीचे सरपंच चांगदेव कांबळे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जातीचा दाखला आणि शिधापत्रिका महत्वाचा दस्तऐवज असून ती विनासायास उपलब्ध झाली पाहिजेत. यासाठी जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याना शाळेतच जातीचे दाखले आणि गावकऱ्यांना शिधापत्रिका गावातच उपलब्ध झाल्यास ती मिळविण्यासाठी होणारा त्रास कमी होईल.

सामान्य माणसाची कामे सहजगतीने व्हावीत, त्याला शासकीय योजनांचा लाभ घेता यावा आणि सामान्य माणसाला सेवा देण्यासाठी प्रशासन गावात जाऊन ही मोहीम राबविणार असल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले. विद्यार्थ्यांना जातीचा दाखला दिल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय करावे लागेल यासाठी संबंधित विभागाशी चर्चा केली जाईल.पालकमंत्री म्हणाले, पाणंद रस्ते हा महत्वाचा प्रश्न असून जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्त्याचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत असून पुरामुळे अनेक ठिकाणचे पाणंद रस्ते खराब झाले असल्याने पाणंद रस्त्याच्या कार्यक्रमास प्राधान्य देण्यात येणार आहे.तहसलिदार रवींद्र सबनीस यांनी स्वागत केले व प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, बहे मंडल मधील बहे, कुबालवाडी व खरातवाडी या गावातील 904 विद्यार्थ्याना जातीचे दाखले व 250 कुटुंबाना शिधपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.

या उपक्रमातून जुनी-खराब रेशनकार्डही बदलून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पंचायत समिती सभापती अश्विनी पाटील, विठ्ठल पाटील, माणिक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषि विभागाकडील योजनांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ मंजुरीचे पत्र, घरकुल योजनेच्या लाभार्थीना धनादेशाचे वितरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगलीSchoolशाळा