शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

विद्यार्थीदशेतील वाचन आयुष्याची शिदोरी

By admin | Published: July 13, 2017 12:06 AM

राजवर्धन पाटील : ‘जयंत वाचन स्पर्धा २०१७’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : आपण विद्यार्थीदशेत जे-जे चांगले वाचाल, त्यातून तुम्हाला आयुष्याची शिदोरी मिळेल़ चांगली पुस्तके व माणसे आपला गुरू असून, त्यांच्यामुळे जीवनाला निश्चित दिशा मिळते, असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. आपणही शालेय जीवनात फारसे अवांतर वाचन करू शकलो नाही़; मात्र पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर मला अवांतर वाचनाची आवश्यकता जाणवली, असेही त्यांनी स्पष्ट केले.राजवर्धन पाटील फौंडेशन बालहक्क संरक्षण मंचच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाळवा तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जयंत वाचन स्पर्धा २०१७’ या उपक्रमांतर्गत त्यांनी शहरातील विविध शाळांना भेट देऊन मार्गदर्शन केले. दिवसभरात त्यांनी विद्यामंदिर, सद्गुरू आश्रमशाळा, यशवंत, जि. प. शाळा क्ऱ १ व साखराळे येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधून स्पर्धेची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.अ‍ॅड़ धैर्यशिला पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, सद्गुरू आश्रमशाळेचे सत्यजित जाधव, मुख्याध्यापक आऱ आऱ बडवे, डी़ टी़ पाटील, सौ़ ए़ ई़ मुळे, राजवर्धन पाटील फौंडेशनचे अध्यक्ष रणजित तेवरे, सचिन पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.राजवर्धन पाटील म्हणाले, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, जीवनात उज्ज्वल यश मिळविले, अशा महापुरुषांची चरित्रे तुम्ही वाचली, तर त्यांचे अनुभव तुम्हाला जीवनभर मार्गदर्शक ठरू शकतात़ मी ७ वी, ८ वी ला असताना हॅरी पॉटरचे काही भाग वाचले़ त्यानंतर चित्रपट आल्यामुळे पुढचे भाग वाचायचे राहिले़ मात्र चित्रपट पाहतानाही आपण हे कुठेतरी पूर्वी पाहिले आहे, असेच वाटले़ सध्या मी बॅँकेतील नोकरी करताना फुटबॉल खेळणे, जिमबरोबर वाचनावर भर दिला आहे़ अ‍ॅड़ धैर्यशिला पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी एकनाथ मुळे, रजनीकांत बल्लाळ, श्रीमती एम. आय़ तांबोळी, एस़ ए़ पाटील, बी़ ए़ भोसले, आऱ एस़ मदने, व्ही़ एस़ मोरे, आनंदराव पाटील, फौंडेशनचे संकेत गिरीगोसावी, सूरज कचरे, यासिन शेख, सूरज पाटील, विशाल राठोड, रोहित पवार, प्रज्ज्वल दळवी, सूरज कुशिरे, योगेश लोखंडे, निहाल तांबोळी, वैभव गुजर, रोहित कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले़ यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. आजीचे अजून वाचनयावेळी राजवर्धन पाटील म्हणाले, माझी आजी ९४ व्या वर्षी बराक ओबामा वाचत असताना, आम्हाला आश्चर्य वाटले़ अमेरिकेसारख्या महासत्तेच्या अध्यक्षस्थानापर्यंत पोहोचताना ओबामांनी काय संघर्ष केला, हे या पुस्तक वाचनातून कळले, असे त्यांनी सांगितले़ वाचनासाठी कोणतेही वय नाही. नेहमी वाचत राहिले पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्नांची आपणाला उत्तरे मिळतात.