सांगली : विद्यार्थिनींनी स्वत:च्या संरक्षणासाठी सज्ज व्हावे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन सांगली शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक खंडेराव रंजगे यांनी केले.
येथील पुरोहित कन्या प्रशालेत महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने खंडेराव रंजगे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रद्धा केतकर यांनी केले. यावेळी रंजगे यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षण कसे करावे, याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पोलीस विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचीही माहिती देऊन मुलींनी स्वतःला कमी न समजता एक चांगला संकल्प मनामध्ये धरून आपल्या ध्येयाप्रती वाटचाल केल्यास निश्चितपणे यश मिळेल. यावेळी पाेलीस काजल चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर यांचे कटाक्षाने पालन केल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन रघुवीर रामदासी यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक सुनील कुलकर्णी मानले. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख संदीप पोरे यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.