वाटेगाव : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेतील यश उल्लेखनीय आहे. स्पर्धा परीक्षेसाठी याचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होईल, असे प्रतिपादन प्रा. आत्माराम देवकर यांनी केले.
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत भाटवाडी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळेतील अंजली अर्जुन कदम हिने स्थान मिळविले. अंजलीसह तिला मार्गदर्शन करणाऱ्या प्रणिशा गुरव यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय आझाद विद्यालय, कासेगाव येथे कार्यरत संगीता रोकडे यांचाही सत्कार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. यावेळी प्रा. आत्माराम देवकर, सरपंच सुरेश उथळे, उपसरपंच भाऊसाहेब निकम, तंटामुक्तीचे अध्यक्ष हौसराव उथळे, कृष्णदेव देवकर, दीपक रोकडे, मुख्याध्यापिका रजनी गावडे, सुनील गुरव, सुनीता धुमाळ, विजया देवकर, गीतांजली कांबळे, बालम मुल्ला, शिवाजी साळुंखे, संस्कृती रोकडे आदी उपस्थित होते
फोटो : १६ वाटेगाव १
ओळ : भाटवाडी (ता. वाळवा) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आत्माराम देवकर, संगीता रोकडे, सुरेश उथळे, रजनी गावडे यांच्याहस्ते करण्यात आला.