शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

विट्यात विवाहितेची आत्महत्या, दोन चिमुरड्यासह घेतली विहिरीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 5:25 PM

यामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ही घटना किरकोळ घरगुती वादातून झाल्याचे  समजते

विटा (सांगली) : सांगली जिल्ह्यातील विटा शहरातील शाहूनगर उपनगरात वास्तव्यास असलेल्या विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. सोनाली बिहुदेव हात्तेकर (वय २६) या महिलेने तिची मुलगी आरोही (४) व एक महिन्याच्या बाळाला घेऊन विहिरीत उडी टाकून आपली जीवनयात्रा संपविली.विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटा येथील शाहूनगर परिसरातील नगरपालिका शाळा नं. १३ जवळ हात्तेकर कुटुंब भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी विवाहिता सोनाली हत्तेकर ही आपली चार वर्षाची मुलगी आरोही आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र सोनाली व दोन चिमुरडे कुठेही आढळून आले नाहीत. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील नेवरी रस्त्यावरील शिवाजीनगर येथे राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत एका महिलेने दोन चिमुरड्यासह आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी समजली. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, उपनिरीक्षक पांडूरंग कन्हेरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी विवाहिता सोनाली हिच्यासह तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसून आले. यावेळी पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या तिघांचे मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढून विटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, या घटनेतील मृत विवाहितेचा पती बिहुदेव हा मजुरीचे काम करत आहे. यामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ही घटना किरकोळ घरगुती वादातून झाल्याचे  समजते. या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी