सांगली : मुलाच्या मृत्युमुळे नैराश्य आलेल्या महिलेने बुधवारी विषारी औषधप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सांगलीत घडली. संगीता शशिकांत दाणेकरी (वय ४०, रा. फौजदार गल्ली) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
फौजदार गल्लीत मयत संगीता या पती, सासूसह रहात होत्या. दोन वर्षापूर्वी त्यांच्या अकरा वर्षाच्या मुलाचा फीटच्या आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर सतत त्या नैराश्येत होत्या. मयत मुलगा सतत स्वप्नात येत असल्याचे संगीता या वारंवार सांगत होत्या. मंगळवारीही त्यांनी तिचे वडील व भावाला ही बाब सांगितली होती. बुधवारी सकाळीही त्यांचे भावाशी दूरध्वनीवरून बोलणे झाले होते. त्यांचे पती शशिकांत हे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे काम करतात. बुधवारी सकाळी पती कामावर गेलो होते. तर सासू कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. साडेअकराच्या दरम्यान संगीता यांनी विषारी औषध प्राशन केले. पण औषधाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी गळ्याला स्कार्पही आवळून घेतला होता.पती शशिकांत घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने संगीता यांना शासकीय रुग्णालयात हलविले. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.---------------------------------------------------------------------------सांगलीत पुत्रवियोगातून महिलेची आत्महत्यासांगली : मुलाच्या मृत्युमुळे नैराश्य आलेल्या महिलेने बुधवारी विषारी औषधप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सांगलीत घडली. संगीता शशिकांत दाणेकरी (वय ४०, रा. फौजदार गल्ली) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.फौजदार गल्लीत मयत संगीता या पती, सासूसह रहात होत्या. दोन वर्षापूर्वी त्यांच्या अकरा वर्षाच्या मुलाचा फीटच्या आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर सतत त्या नैराश्येत होत्या. मयत मुलगा सतत स्वप्नात येत असल्याचे संगीता या वारंवार सांगत होत्या. मंगळवारीही त्यांनी तिचे वडील व भावाला ही बाब सांगितली होती. बुधवारी सकाळीही त्यांचे भावाशी दूरध्वनीवरून बोलणे झाले होते. त्यांचे पती शशिकांत हे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे काम करतात. बुधवारी सकाळी पती कामावर गेलो होते. तर सासू कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. साडेअकराच्या दरम्यान संगीता यांनी विषारी औषध प्राशन केले. पण औषधाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी गळ्याला स्कार्पही आवळून घेतला होता.पती शशिकांत घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने संगीता यांना शासकीय रुग्णालयात हलविले. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.---------------------------------------------------------------------------