कोकरूड : सावंतवाडी (ता. शिराळा) येथील शुभांगी शिवाजी सावंत (वय १६) हिने रविवारी रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
शुभांगीने रात्री सर्वांबरोबर घरी जेवण केले. त्यानंतर घरातील लोक बोलत बसले असताना रविवारी रात्री नऊच्या सुमारास ती घराबाहेर गेली. बराच वेळ ती परत घरी न आल्याने घरातील लोकांनी शेजारच्या घरात चौकशी केली, मात्र ती जवळपास कुठेच आढळून न आल्याने शोधाशोध केली असता घरापासून काही अंतरावर असलेल्या सुतारांच्या विहिरीतील पाण्यावर काही तरी तरंगत असल्याचे दिसले. कपडे आणि वर्णनावरून ती शुभांगीच असल्याची खात्री पटली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.