नेर्ले : तांबवे (ता. वाळवा) येथील शेतकरी कुटुंबातील सुमित पाटील व धनश्री पाटील यांची उच्चशिक्षणासाठी आयर्लंड (युरोप) येथे निवड झाली. याबद्दल त्यांचा सह्याद्री उद्योग समूह व नामदेवदादा प्रतिष्ठान यांच्यावतीने व्यंकटराव देशमुख यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
सुमित पाटील यांनी व्हीआयटी, वेल्लोर (तामिळनाडू) येथून पदवी प्राप्त करताना त्यांचा शोधनिबंध जागतिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला. पदवीनंतर त्यांची बँक ऑफ अमेरिका येथे सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून निवड झाली. तेथे चार ग्लोबल रेकग्निशन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या पत्नी धनश्री पाटील यांनीही वेल्लोर येथून पदवी प्राप्त केली. त्यांचेही दोन विषयावरचे शोधनिबंध जागतिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले. दोघेही एमएस करण्यासाठी आयर्लंड येथे नुकतेच रवाना झाले. सत्कारप्रसंगी अश्विनी पाटील, डॉ. सुवर्णा पाटील, शिवाजीराव पाटील, विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुशांत पाटील प्रास्ताविक केले. जयदीप पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्ञानदेव पाटील, संतोष देशमुख, पी. एन. पाटील, माणिकराव पाटील, योगेश देशमुख, शशिकांत पाटील उपस्थित होते .