ओळी अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल व इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी समर कॅम्पचा समारोप प्राचार्य सुभाष पाटील व दीपाली देसाई यांच्या उपस्थितीत झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल व इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यावतीने १० मे २० मे या कालावधीत ऑनलाईन समर कॅम्प संपन्न झाला.
प्राचार्य सुभाष पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात पालकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कॅम्पमध्ये वयोगटानुसार योगासने, कराटे, चित्रकला, गायन, वादन, नाट्य, अभिनय, कथाकथन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले. मानसिक आरोग्य व वक्तृत्व कौशल्य यांच्यावर मार्गदर्शन झाले. पालक प्रतिनिधी डॉ. अश्विनी पाटील (इस्लामपूर), डॉ. राजेश जगताप, संगीता लोखंडे (मुंबई), गौरी वाघमोडे (चिपळून), माया शिंगारे (आष्टा), महादेव गायकवाड (कवठेपिरान) इत्यादी पालकांनी मनोगते व्यक्त केली. सहायक शिक्षक रवींद्रनाथ माळी, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. ऊर्मिला चव्हाण, योगेश शिंगारे, विजय माळी, मिलिंद कांबळे, सुशांत घोरपडे, संदीप पाटील, अक्षय जाधव, स्नेहल गायकवाड, प्रियंका कांबळे, धनश्री पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. विक्रम पाटील, मुख्याध्यापिका दीपाली देसाई, मुख्याध्यापक संजय चव्हाण उपस्थित होते. सईद पिरजादे यांनी स्वागत केले तर सारिका इटकरकर यांनी आभार मानले.