शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मध्य रेल्वेला सांगली स्थानकाचे वावडे का?, उन्हाळी विशेष गाड्यांचा थांबा देतानाही दुजाभाव

By अविनाश कोळी | Published: April 15, 2024 1:46 PM

सांगली : तिकीट विक्री व उत्पन्नाच्या माध्यमातून एकीकडे सांगली रेल्वे स्थानक नवनवे विक्रम नोंदवित असताना विशेष गाड्यांना थांबा नाकारण्याचा ...

सांगली : तिकीट विक्री व उत्पन्नाच्या माध्यमातून एकीकडे सांगलीरेल्वे स्थानक नवनवे विक्रम नोंदवित असताना विशेष गाड्यांना थांबा नाकारण्याचा विक्रम मध्य रेल्वेकडून नोंदविला जात आहे. सांगलीबाबतचा दुजाभाव अनेकदा स्पष्ट झाला आहे. जवळच्या दोन रेल्वे स्थानकांना महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक ठिकाणी थांबा दिला जात असतानाही सांगलीला मिरजेचे स्थानक जवळ असल्याने थांबा नाकारला जात आहे.

सर्वात कमी तिकीट विक्री असूनही सातारा रेल्वे स्थानकावर उन्हाळी विशेष गाड्यांना सांगलीपेक्षा अधिक थांबे दिले गेले आहेत. त्यामुळे सांगलीतील सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. दहा वर्षांत रेल्वेगाड्यांचा विस्तार होत असताना सांगली स्थानकाच्या वाट्याला फारसे काही आले नाही. सातत्याने प्रवासी संघटनांची मागणी धुडकावून सांगली स्थानकावर थांबा देण्यासाठी रेड सिग्नल दाखविण्यात आला.सांगलीतून नव्या गाड्या जाणार, पण त्या येथील स्थानकावर थांबणार नाहीत. सांगलीतून दररोज २० हजार लोकांना १५ कि.मी. दूर मिरजेतून रेल्वे पकडण्यासाठी जावे लागते. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सांगली रेल्वे स्टेशनच्या अस्तित्वाचा प्रश्न प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे. देशामध्ये सर्वत्र रेल्वेगाड्यांचे जाळे पसरत आहे.गेल्या दहा वर्षांत देशातील अनेक छोट्या शहरांतील रेल्वे स्टेशनवरून एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या सुरू होऊ लागल्या आहेत. मात्र, सांगलीबाबत अजूनही विस्ताराची पावले पडताना दिसत नाहीत. देशात गेल्या दहा वर्षांत एक हजाराहून अधिक नवीन रेल्वेगाड्या सुरू केल्या व दोन हजार गाड्यांचा विस्तार केला गेला; पण सांगली जिल्ह्याच्या वाट्याला काय आले, असा सवाल उपस्थित होत आहे.पहिली एक्स्प्रेस लाभलीजिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सांगली रेल्वे स्थानकावर गेल्या दहा वर्षांत दोन रेल्वेगाड्यांनाच थांबा मिळाला. तसेच दीड महिन्यापूर्वी रानी चेन्नम्मा ही पहिली एक्स्प्रेस सांगलीला लाभली. त्यासाठी इतक्या वर्षांचा कालावधी जावा लागला.सांगलीसाठीच वेगळा नियममहाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील अनेक राज्यांत वीस किलोमीटर अंतरातील दोन स्थानकांना थांबे दिले आहेत. तरीही सांगली व मिरज जवळ असल्याने सांगलीला थांबा देता येत नसल्याचे कारण वारंवार पुढे केले जात आहे. सांगलीसाठी हा वेगळा नियम लावण्यात आला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे