शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सांगलीत अक्षय तृतीयेस खरेदीला सोनेरी झळाळी

By admin | Published: April 29, 2017 12:05 AM

१५ कोटींची उलाढाल : सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक्ससाठी झुंबड

सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, वाहन, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी शुक्रवारी ग्राहकांनी सांगलीच्या बाजारपेठेत गर्दी केली होती. सोने खरेदी करण्यासाठी तर सराफ पेढीवर रांगा लागल्या होत्या. लग्नसराईमुळे सोने खरेदीला अधिकच झळाळी आली होती. तसेच वाहनविश्वातही मोठी उलाढाल झाली असून, दोन हजाराहून अधिक दुचाकी, तर तीनशेहून अधिक चारचाकी रस्त्यावर आल्या. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येही दोन कोटीची उलाढाल झाली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक ग्रॅम का होईना, सोने खरेदी करावी, असा लोकांचा विश्वास आहे. म्हणूनच शुक्रवारी सकाळपासूनच सोने-चांदी खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. लग्नसराई सुरू असल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी होती. खरेदीसाठी सराफ पेठ आणि विश्रामबाग येथे पु. ना. गाडगीळ पेढी, आर. बी. भोसले ज्वेलर्ससह सर्वच सराफ पेढीवर गर्दी होती. शुक्रवारी दिवसभरात सरासरी २९ हजार २०० रुपये सोने दहा ग्रॅमचा दर राहिला, तर चांदीचा सरासरी दर ४० हजार ८०० रुपये किलोस होता. सोन्यात नेकलेस, चेन, गंठण, मंगळसूत्र, कानातले टॉप्स खरेदीसाठी अधिक ओढा होता. एक ग्रॅमच्या दागिन्यांनाही चांगलीच मागणी होती. दुचाकी विश्वात गतवर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्के वाढ झाली होती. विविध कंपन्यांच्या दुचाकींंना चांगली मागणी होती. जास्त मायलेज देण्याऱ्या वाहनांना पसंती होती. तरुणाईत हेवी वेट आणि स्टायलिश दुचाकी खेरदी केल्या जात होत्या. दोन हजाराहून अधिक दुचाकी अक्षय तृतीयेला रस्त्यावर आल्या. इलेक्ट्रॉनिक कंपन्यांकडून सुलभ हप्त्यांची उपलब्ध केलेली सोय व पर्यायही उपलब्ध असल्याने शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकानात ग्राहकांनी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोबाईल, पंखे, फ्रीज, कुलर, एसी, एलईडी टीव्ही, होम थिएटर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. फर्निचर बाजारातही चांगली उलाढाल झाली. त्याचा लाभ उठवत ग्राहकांनी खरेदी केली. स्क्रॅच कार्ड, भेटवस्तू आणि त्वरित कर्जपुरवठा, १० ते ३० टक्क्यांपर्यंत सूट या सुविधेमुळे केवळ विंडो शॉपिंग करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनीही खरेदी केली. चारचाकी खरेदीलाही समाधानकारक प्रतिसाद मिळाला. गेल्या काही वर्षापासून शेतीसाठी लागणारे छोटे ट्रॅक्टर्स व अवजारांच्या खरेदीला शेतकरी वर्ग प्राधान्य देत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत या छोट्या वाहनांचीही चांगली विक्री झाली. अक्षय तृतीयेच्या सणादिवशी सोने खरेदीबरोबरच आंबा खरेदीलाही विशेष महत्त्व असते. आमरस-पोळीचा बेत घरोघरी केला जातो. त्यामुळे गुरूवारपासूनच शहरात ठिकठिकाणी आंबे खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. सांगली-मिरज रोड, कॉलेज कॉर्नरसह शहराच्या विविध भागात फळे विक्रेत्यांनी आंबा विक्रीसाठी खास स्टॉल उभारले होते. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, कर्नाटक आणि रत्नागिरी पायरी आंब्याला मागणी होती.पाडव्याप्रमाणे अक्षय तृतीयेलाही घर खरेदीचे स्वप्न सत्यात उतरत असते. शुक्रवारी काहींनी या मुहूर्तावर फ्लॅटचे बुकिंग केले, तर अनेक बिल्डरांकडे फ्लॅटबाबत विचारणा होत होती. नोटाबंदीनंतर जमीन, घर खरेदीच्या व्यवहारावर मंदीचे सावट आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर फ्लॅट, प्लॉट व्यवसायात थोडीफार हालचाल जाणवली. ही दिलासादायक बाब आहे. आणखी काही दिवसांत जमीन, घर खरेदीच्या व्यवहारात आशादायक चित्र दिसेल, असे बांधकाम व्यावसायिक दीपक सरडे यांनी सांगितले. एकूणच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीतील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होती. वाहन, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीतून १५ कोटीची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाडव्यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीकरांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला (प्रतिनिधी) दुचाकी खरेदी : ग्राहकांचा प्रतिसाद३१ मार्चला दुचाकी कंपन्यांकडून बीएस ३ मानांकनाच्या वाहनांची, मोठी सूट देऊन विक्री करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या पंधरवड्यात आलेल्या अक्षय तृतीयेला वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होणार का? याबाबत दुचाकी वाहन वितरकांमध्ये शंका होती. पण शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला. तारळेकर, ट्रायकलर होंडा, पट्टणशेट्टी होंडा, मिलेनियम होंडासह सर्व शोरूममध्ये दिवसभर गर्दी होती. गतवर्षीच्या अक्षय तृतीयेच्या तुलनेत यावर्षी दुचाकी विक्रीत दहा ते बारा टक्के वाढ झाल्याचे श्रीकांत तारळेकर यांनी सांगितले. ‘चारचाकी’लाही मागणीनोटाबंदी, मंदीच्या काळातही चारचाकी वाहन खरेदीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्वच वाहन विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होती. जवळपास तीनशेहून अधिक चारचाकी वाहनांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. त्यातून चार ते पाच कोटीची उलाढाल एकट्या चारचाकी वाहन विक्रीतून झाल्याचे सांगण्यात आले.