येथे बुधवारी देसाई यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके, मुख्याधिकारी अतुल पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, सभापती महावीर शिंदे उपस्थित होते.
देसाई म्हणाले, प्रशासनातील सर्व घटकांनी एकत्र येऊन लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. लोकांनी शासनाला योग्य प्रकारे सहकार्य केले तर महिन्याभरात आपण या संकटावर मात करू. कायदा मोडतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा.
चौकट
देसाई म्हणाले की, कोणत्याही क्षणी शासन कडक निर्बंध लागू करेल, यासाठी पोलीस दलाची बंदोबस्त, नाकेबंदीबाबत तयारी असली पाहिजे. लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, याची तयारीही पोलीस यंत्रणेने करावी.