येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे डॉ. सुरेश भोसले यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी शिवाजीराव पाटील, बाबासाहेब शिंदे, व्ही.टी. पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीतून केलेल्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ हा विजयाची नांदी ठरत असतो. सहकाराबरोबरच चांगला विचार जोपासण्यासाठी सभासदांनी पुन्हा एखदा सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या येडेमच्छिंद्र- वांगी गटातील जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचाराच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. सुरेश भोसले, उमेदवार शिवाजीराव पाटील, बाबासाहेब शिंदे यांनी क्रांतिसिंहांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
राजारामबापू बॅँकेचे संचालक अॅड. संग्राम पाटील म्हणाले, जलसिंचन योजनामुळे गावचा सर्वांगीण विकास झाला आहे. सर्वाधिक दर, मोफत साखर व कृष्णा हॉस्पिटलचे कोरोनाकाळातील कार्य सभासद कधीही विसरणार नाहीत.
यावेळी सरपंच गणेश हराळे, दिलीपराव देसाई, पंढरीनाथ पाटील, प्रकाश पाटील, सुनील पोळ, महिपती पाटील, अजित पाटील, सचिन हुलवान, डॉ. विश्वास पाटील, विश्वजित पाटील, बाळासाहेब पाटील, रणजित पाटील, सर्जेराव पाटील, राहुल खराडे, शरद पाटील, रावसाहेब पाटील, सुभाष चव्हाण, सुहास पाटील, संभाजी सुतार, संदीप पाटील, कुलदीप पाटील, शरद जगदाळे उपस्थित होते.