सांगली : भाजप विचाराने आमच्या जवळचा कधीच असणार नाही. काँग्रेस मात्र विचाराने जवळचा असल्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादी त्यांनाच पाठिंबा देईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी सांगलीत गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे बोलणी करीत आहेत. ही चर्चा सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, जिल्हा परिषदेत भाजपकडे २५, राष्ट्रवादीकडे १४, काँग्रेसकडे १०, रयत विकास आघाडीचे तीन, शिवसेनेचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापण्यासाठी ३१ सदस्यांची गरज आहे. त्रिशंकू अवस्था असल्यामुळे सत्ता स्थापण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी लाजनतेने नाकारले असल्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार नाही; पण काँग्रेसकडून सत्ता स्थापन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न झाल्यास त्यांना पाठिंबा देण्यात येईल. भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष विचाराने निश्चितच आमच्या खूप जवळचा आहे. भाजप जातीयवादी असून, त्यांचे विचारही आमच्याशी जुळत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेत आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाही. जिल्हा परिषदेतील सत्ता जमविण्याच्यादृष्टीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कदम आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे चर्चा करीत आहेत. राष्ट्रवादीचे १४ आणि अजितराव घोरपडे गटाचे दोन अशी आमच्याकडे १६ सदस्य संख्या आहे. उर्वरित संख्याबळाची जुळवाजुळव काँग्रेस पक्ष करीत आहे. त्यादृष्टीने त्यांची अन्य आघाड्या आणि पक्षांच्या नेत्यांबरोबर बोलणी चालू असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)परिचारकांचा भाजपने राजीनामाच घ्यावासीमेवरील सैनिकांबद्दल भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेले विधान निषेधार्हच आहे. याबाबत परिचारकांनी माफी मागून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना कमी होणार नाहीत. भाजपने परिचारक यांचा राजीनामाच घेतला पाहिजे, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.पाणीटंचाईवर विधानसभेत आवाज उठविणारजिल्ह्यात पाणीटंचाई असतानाही भाजप सरकार कोणतेही निर्णय घेत नाही. जलसंधारणाची कामे केल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई नसल्याचे प्रशासन भासवत आहे. त्यामुळे जनतेचे मात्र हाल होत असून, या प्रश्नावर विधानसभेत मी स्वत: आणि आमदार सुमनताई पाटील आवाज उठविणार आहोत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
पाठिंबा भाजपला नव्हे ‘काँग्रेस’ला
By admin | Published: March 02, 2017 11:41 PM