इस्लामपूर : मुंबईतील रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान अशा सेवाभावी संस्था सामाजिक बांधिलकीतून गोर-गरिबांना मदतीचा हात देत असल्याने त्यांचे जीवन सुसह्य व समृध्द होत असल्याची भावना माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली़ येथील राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या सभागृहात रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टने आमदार पाटील यांच्याहस्ते वाळवा तालुक्यातील अपंगांना तीनचाकी सायकली, जयपूर फूट, कुबड्या, बहिऱ्या व्यक्तींना श्रवणयंत्र, गोर-गरीब महिलांना साड्या, मुले-मुलींना कपडे वाटप करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने संयोजन केलेल्या या कार्यक्रमात डॉ़ संतोष भोसले, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आऱ डी़ सावंत, बालाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला़ प्रबोधिनीचे कार्यवाह प्रा़ शामराव पाटील,जी़ आऱ शहा, पराग शहा, समन्वयक लक्ष्मण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.क्लिपबूट व कुबड्या मिळालेल्या सौ़ सुरेखा जाधव साखराळे, विद्यार्थिनी कु़ सुवर्णा भानुसे, बोरगाव यांनी कृतज्ञता व्यक्त केली़ घबकवाडी सर्जेराव घाडगे, येडेनिपाणी, शुभम थोरात, सुदाम कालेकर, वाळवा, राजाराम खोत, पडवळवाडी, अजित पाटील, दुधारी, विक्रम वाघमारे, इस्लामपूर, प्रकाश भक्ते, शिवपुरी यांना तीनचाकी सायकल, भास्कर पाटील, तांबवे, बाबासाहेब तवटे, नवेखेड यांना जयपूर फूट व कुबड्या, यश यादव, पडवळवाडी यास कुबड्या, दगडू सुपनेकर, नायकलवाडी यास कानाचे मशीन, वैष्णवी पाटील, इटकरे, सौ़ सुरेखा जाधव, साखराळे यांना क्लिपबूट व कुबड्या, महादेव जाधव, साखराळे यांना श्रवणयंत्र, श्रीकांत गायकवाड, शिरटे यास श्रवण यंत्र तसेच शेकडो महिला, मुले-मुलींना साड्या, कपडे वाटप करण्यात आले.अभियानचे संघटक कुमार पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले़ . याप्रसंगी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, विनायक कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)कृतज्ञतेची भावना...विविध सामाजिक संस्थांमुळे आजवर अनेक गरजुंना आधार मिळाला आहे. इस्लामपुरात आमदार जयंत पाटील यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानामुळे आजवर अनेकांना आधार मिळाला आहे. या अभियानातून होणारे आदर्शवत काम पाहून रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टनेही यामध्ये सहभागी होत मदतीचा हात दिला आहे. या कार्यक्रमात अनेकांना तीनचाकी सायकल, जयपूर फूट, कुबड्या, श्रवणयंत्र, साड्या, मुले-मुलींना कपडे वाटप करण्यात आले. यामुळे आजवर आपल्या अपंगत्वाशी झगडणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान बरेच काही सांगून गेले. यावेळी मनोगत व्यक्त करताना क्लिपबूट व कुबड्या मिळालेल्या सौ़ सुरेखा जाधव (रा. साखराळे), विद्यार्थिनी कु़ सुवर्णा भानुसे (रा. बोरगाव) यांनी कृतज्ञता व्यक्त केली़ घबकवाडी येथील अमित खोत, सौ़ माया खोत या आई-वडिलांनी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानमुळे मुलाचा पुनर्जन्म झाल्याची भावना व्यक्त केली.
सेवाभावी संस्थांमुळे सामान्यांना आधार
By admin | Published: June 29, 2015 10:59 PM