ओळ : विटा येथे खानापूर तालुका आरोग्य पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष विश्वास दळवी यांच्या हस्ते मयत सभासद शशिकला कांबळे यांच्या वारसांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
विटा : आरोग्य विभागात काम करीत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मानसिक तणाव आणि अन्य कारणांमुळे कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे दु:खद घटना घडत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पश्चात वारसांना खानापूर तालुका आरोग्य कर्मचारी पतसंस्थेकडून आर्थिक आधार दिला जात असल्याचे प्रतिपादन आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास दळवी यांनी केले.
विटा येथील खानापूर तालुका आरोग्य कर्मचारी पतसंस्थेच्या सभासद आणि नेवरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कडेगाव उपकेंद्रातील आरोग्यसेविका शशिकला बळी कांबळे यांचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर संस्थेच्या वतीने त्यांच्या वारसांना तातडीच्या आर्थिक मदतीचा धनादेश अध्यक्ष दळवी यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी अध्यक्ष दळवी यांनी आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी हे संस्थेचे सभासद व कुटुंबातील आहेत. त्यांच्या दु:खात सहभागी होऊन संस्था वारसदारांना आर्थिक मदत करीत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास बळी कांबळे, नीता शिंदे, जयश्री कोरे, संगीता शिंदे, सरस्वती गारेले यांच्यासह मृत शशिकला कांबळे यांचे नातेवाईक उपस्थित होते.