शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सुरेश आवटी यांचे नगरसेवकपद रद्द

By admin | Published: August 06, 2016 12:33 AM

उच्च न्यायालय : जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम; दगडफेकप्रकरणी झाली होती शिक्षा

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरविण्याचा जिल्हा न्यायालयाचा निकाल शुक्रवारी उच्च न्यायालयानेही कायम ठेवला. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आर. पी. सोंडूरबलदोटा यांनी आवटी यांची याचिका फेटाळून लावली. त्यांना सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. या निकालाने महापालिकेतील काँग्रेसला धक्का बसला आहे. महापालिकेच्या २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मिरजेतील प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेश आवटी विजयी झाले होते. आवटी यांना मिरज कार्यालयावरील दगडफेकप्रकरणी २०११ मध्ये मिरजेतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षे दहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. उमेदवारी अर्ज छाननीवेळी कुणीही त्यांच्या अर्जाबाबत हरकत घेतली नव्हती. त्यामुळे ते निवडणुकीस पात्र ठरले. त्यानंतर निवडूनही आले. छाननीवेळी त्यांच्या शिक्षेला स्थगिती नव्हती. त्यामुळे याच मुद्द्यांवर या प्रभागातील पराभूत उमेदवार आबा पाटील यांनी याचिका दाखल केली होती.निवडणूक प्रतिज्ञापत्रातील शिक्षेची माहिती लपविण्यात आली आहे. मिरज न्यायालयाने नैतिक अध:पतन झाल्याचे ताशेरे ओढत, आवटी यांच्यासह अन्य काही लोकांना शिक्षा सुनावली होती. निकालपत्रात आवटी व इतर महापालिकेचे नगरसेवक विश्वस्त असताना, त्यांनी मालमत्तेचे नुकसान केले, ते नैतिक अध:पतनच असल्याचे नमूद केले होते. महाराष्ट्र महापालिका कायदा कलम १० (१) अ नुसार न्यायालयाने नैतिक अध:पतनाखाली एखाद्याला शिक्षा सुनावली असेल, तर त्याला निवडणूक लढविता येत नाही, अशी तरतूद आहे. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्यांचे नगरसेवकपद रद्द केले होते. त्यानंतर आवटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेले सहा महिने या याचिकेवर सुनावणी सुरू होती. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सोंडूरबलदोटा यांनी आवटी यांना अपात्र ठरवीत जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. या खटल्यात आवटी यांच्यावतीने अ‍ॅड. एम. एल. पाटील यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)मैनुद्दीन बागवान यांचे काय?मिरज कार्यालयावरील दगडफेकीत सुरेश आवटी यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचेही नगरसेवकपद रद्द झाले होते. बागवान यांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर २० आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आवटी अपात्र ठरल्याने आता बागवान यांच्या निकालाकडेही मिरजकरांचे लक्ष लागले आहे. सुप्रिम कोर्टात अपिलासाठी दीड महिनाउच्च न्यायालयाने आवटी यांचे नगरसेवकपद रद्द ठरविले असले तरी, सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत ते नगरसेवक म्हणून कायम राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करायचे की नाही, याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे आवटी यांनी सांगितले.महापौर पदाचे दावेदार : सुरेश आवटी महापौर पदाचे दावेदार होते. फेब्रुवारी महिन्यात महापौर निवडीवेळी आवटी व त्यांच्या समर्थकांनी तयारी केली होती; पण हारूण शिकलगार यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. नऊ महिन्यांनंतर आवटी यांना महापौर करण्याचे आश्वासनही दिले होते; पण आता पदच रद्द झाल्याने महापौर पदाच्या शर्यतीतून ते बाद ठरले आहे.