शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सांगली जिल्ह्याला चार मंत्रिपदांची अपेक्षा, प्रबळ दावेदार कोण.. जाणून घ्या

By संतोष भिसे | Published: November 25, 2024 6:07 PM

सुरेश खाडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी सर्वाधिक

संतोष भिसे

सांगली : जिल्ह्यात भाजप महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर मंत्रिपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, खानापूरचे सुहास बाबर व जतचे गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील आठ जागांपैकी पाच ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकला आहे. महायुतीचे सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे पुन्हा निवडून आले आहेत. गाडगीळ तिसऱ्यांदा, तर खाडे मिरजेतून चौथ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी खाडे यांच्या सहा महिन्यांसाठी समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्रीपद होते. त्यानंतर ते कामगार मंत्री म्हणून कार्यरत होते. नव्या टर्ममध्ये त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी सर्वाधिक आहे. शिवाय सलग पाचवेळा आमदार आणि मंत्रीपदाचा दीर्घ अनुभव पाहता त्यांचा वाट्याला वजनदार खाते येऊ शकते.

आमदार गाडगीळ यांना गेल्या टर्ममध्येच मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. या निवडणुकीत त्यांना हॅटट्रीक मिळविल्याने मंत्रिपदाची दावेदारी प्रबळ झाली आहे. १० वर्षांचा विधीमंडळाचा अनुभव पाहता त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.आटपाडी तालुक्यातून जतमध्ये जाऊन आमदारकीला गवसणी घातलेल्या गोपीचंद पडळकर हेदेखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जाते. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. आजवर त्यांनी विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे. आता थेट लोकांतून निवडून आल्याने मंत्रिपदाची दावेदारी वाढली आहे. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते.

अनिल बाबर यांच्या निष्ठेचे फळखानापूरचे सुहास बाबर यांनी जिल्ह्यात विक्रमी मताधिक्य मिळविले आहे. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा वारसदार म्हणून सुहास यांना राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनिल बाबर एकनिष्ठ राहिले होते. शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही अनिल बाबर पहिल्याच टप्प्यात त्यांच्यासोबत गेले होते. या निष्ठेची पावती म्हणून सुहास बाबर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीministerमंत्रीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024