लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात अनेक मोठी झाडे धोकादायक बनली आहेत. नुकतेच वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे महापालिकेने शहरातील धोकादायक झाडांचा सर्व्हे करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी केली.
शिंदे म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वेळी काही ठिकाणी झाडे कोसऴली. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पाऊस व वाऱ्यामुळे झाडे, झाडांच्या फांद्या पडून कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून तातडीने महापालिका क्षेत्रातील धोकादायक झाडांचा सर्व्हे करावा.
या वेळी नगरसेविका शिंदे यांनी प्रभाग क्रमांक १६ मधील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटून घेतल्या. या वेळी गजानन मोरे, श्रीधर मेस्त्री, आशिष साळुंखे, ओंकार गावडे, लीनाताई सावर्डेकर उपस्थित होते.