इस्लामपूर : विविध समाजातून देवाच्या नावाखाली मुक्या प्राण्यांचा बळी दिला जातो. या घटनांना अंधश्रद्धेची किनार आहे. परंतु यावर मात करीत इस्लामपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मानसिंग पाटील यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे संभुआप्पा-बुवाफन या नावे मुख्या प्राण्याला (बोकड) जीवदान देऊन खुलेआम सोडण्यात आले आहे.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून जनतेला शारीरिक, आर्थिक, मानसिक स्वरुपाच्या प्रश्नांतून उत्तम मार्ग प्राप्त व्हावा, हाच पाटील यांचा उद्देश आहे. शहरातील जागरूक देवस्थान संभुआप्पा-बुवाफनचे भक्त मानसिंग पाटील यांनी कोरोनाचे संकट असताना यातून आता नागरिकांची सुटका व्हावी, म्हणून या देवस्थानला नवस बोलला होता. आता कोरोनाचे संकट निवळले आहे. म्हणून त्यांनी या मुक्या प्राण्याला जीवदान देऊन देवाच्या नावाने मोकळेपणाने सोडले आहे. त्याला कोणी त्रास देऊ नये किंवा त्याची विकृत बुद्धीने चोरी करू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, अजित पाटील, एम. जी. पाटील, पोपट पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ३११२२०२०-आयएसएलएम- इस्लामपूूर न्यूज
संभुआप्पा-बुवाफन यांच्या नावाने मुक्या प्राण्याला जीवदान देण्यात आले. यावेळी मानसिंगबापू पाटील, जयवंत पाटील, एम. जी. पाटील, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.