शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

संतोष कदमच्या खुनातील संशयितास कागलमध्ये अटक...

By घनशाम नवाथे | Published: June 12, 2024 9:28 PM

अखेर सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागानेच पकडले

सांगली: माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याच्या खुनात कुरूंदवाड पोलिसांना गेली चार महिने चकवा देणाऱ्या सिद्धार्थ ऊर्फ बाबा सुखदेव चिपरीकर (वय ३२, रा. शिवभारत चौक, सांगलीवाडी) याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कागल (जि. कोल्हापूर) येथे अटक केली.

अधिक माहिती अशी, सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम (रा. गावभाग) याने महापालिकेतील तसेच इतर विभागातील गैरकारभार चव्हाट्यावर आणले. काही प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी तो दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी महापालिकेवर मोर्चा काढणार होता. तत्पूर्वी दि. ६ फेब्रुवारीला तो सांगलीतून तिघांबरोबर मोटारीने कुरूंदवाडला गेला होता. त्यानंतर तो परतला नाही. पत्नीने दि. ७ रोजी सकाळी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच दिवशी दुपारी कुरूंदवाड येथे मोटारीत त्याचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

कुरूंदवाड पोलिसांनी त्याच्या मोटारीतून गेलेल्या नितेश दिलीप वराळे, सूरज प्रकाश जाधव, तुषार भिसे या सांगलीतील तिघांना अटक केली. त्यांनी आर्थिक देवघेवीतून खून केल्याचे सांगितले. तिघांच्या चौकशीतून संशयित सिद्धार्थ चिपरीकर व शाहरूख शेख यांची नावे निष्पन्न झाली. ते फरारी झाले होते.दरम्यान कुरूंदवाड पोलिस ठाण्यातील अधिकारी रविराज फडणीस यांच्यावर मृत संतोषच्या नातेवाईकांनी तपासाबाबत संशय व्यक्त केला होता.

त्यामुळे इचलकरंजीचे उपअधीक्षक समीर साळवे यांच्याकडे तपास सोपवला होता. त्यांनी फरारी दोघांचा शोध घेण्यात अपयश आले. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणला फरारी दोघांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार व पथकास सूचना दिल्या होत्या. या पथकातील हवालदार दीपक गायकवाड यांनी सिद्धार्थ चिपरीकर हा कागल येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने कागल पोलिस ठाणे गाठले. कागल पोलिसांच्या मदतीने सापळा रचून सिद्धार्थला पकडले. त्यानंतर उपअधीक्षक साळवे यांच्या ताब्यात त्याला दिले. तेथून त्याला कुरूंदवाड येथील न्यायालयात हजर केले असता १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली.

सहायक निरीक्षक पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी दीपक गायकवाड, बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, अरूण पाटील, संदीप नलावडे, विनायक सुतार यांच्या पथकाने कारवाई केली.

शाहरूखचा शोध-खून प्रकरणात शाहरूख शेख हा देखील चार महिन्यापासून फरारी आहे. त्याचाही शोध सुरू आहे. या खुनातील माजी नगरसेवकावर संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतू पुरावा नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

चिपरीकर रेकॉर्डवरील गुन्हेगार-

सिद्धार्थ चिपरीकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी गाजलेल्या मिणच्या गवळी खून प्रकरणात तो संशयित होता. खंडणीचाही त्याच्यावर गुन्हा आहे. दुसऱ्यांदा तो खुनात संशयित म्हणून अटकेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली