शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित

By admin | Published: February 17, 2017 11:48 PM

चेंडू शासनाच्या कोर्टात : संजयकाकांची मध्यस्थी; उपायुक्तांकडून लेखी पत्र

सांगली : महापालिकेच्या एलबीटी असेसमेंट तपासणीविरोधात व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठविला असून त्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्याचे लेखी पत्र उपायुक्त सुनील पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी पुकारलेले बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले. खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते सरबत घेऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली. एलबीटी असेसमेंट तपासणी रद्द करावी, सीए पॅनेल बरखास्त करावे, फौजदारी नोटिसा मागे घ्याव्यात यांसह विविध मागण्यांसाठी व्यापारी एकता असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स, वसंतदादा, गोविंदराव मराठे व मिरज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून आंदोलनाला सुरूवात केली आहे. समीर शहा, सुरेश पटेल, सचिन पाटील, नितीन पाटील यांनी उपोषणात भाग घेतला होता. शुक्रवारी दुसऱ्यादिवशीही व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरूच होते. आंदोलनाला जिल्हा सुधार समिती, स्वाभिमानी विकास आघाडी, मनसे, शिवसेनेने पाठिंबा दिला होता.काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील यांनी व्यापारी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. तब्बल तासभर चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. व्यापाऱ्यांनी असेसमेंट तपासणीला स्थगिती देण्याची मागणी लावून धरली. प्रतीक पाटील यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर, महापौर हारूण शिकलगार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर महापौर शिकलगार, उपायुक्त सुनील पवार, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे आंदोलनस्थळी आले. त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली. व्यापारीसुद्धा महापालिकेचे नागरिकच आहेत. त्यांच्या मागण्यांबाबत आयुक्तांशी चर्चा केली आहे. आयुक्तांनी शनिवारी बैठक घेण्याचे मान्य केले आहे. तोपर्यंत व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली. त्यावर, उपोषण स्थगित करण्याचे असेल तर प्रशासनाकडून ठोस हमी मिळाली पाहिजे. आयुक्त, महापौरांनी लेखी हमी द्यावी, अशी मागणी समीर शहा यांनी केली. पण लेखी हमी देण्यास महापौर व उपायुक्त पवार यांनी नकार दिला. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली.सायंकाळी खासदार संजयकाका पाटील, दीपकबाबा शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी आयुक्त, उपायुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा करीत व्यापाऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाला पाठवावा, तो आम्ही मंजूर करून आणतो, अशी जबाबदारी घेतली. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशीही व्यापाऱ्यांची दूरध्वनीवरून चर्चा सुरू होती. चंद्रकांतदादांनीही आयुक्तांना दूरध्वनी करून चर्चा केली. त्यानंतर उपायुक्त सुनील पवार यांनी व्यापाऱ्यांना लेखी पत्र दिले. यात म्हटले आहे की, एलबीटीबाबत व्यापाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात महापालिकेने वस्तुस्थितीचा अहवाल शासनाला सादर केला आहे. या मागण्यांबाबत शासनस्तरावर अंतिम निर्णय होणार आहे. या निर्णयाच्या आधीन राहून योग्य ती कार्यवाही महापालिकेकडून केली जाईल. तोपर्यंत उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली. त्याला मान देत व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. (प्रतिनिधी)संजयकाकांनी घेतली जबाबदारीएलबीटी असेसमेंटविरोधात व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते. व्यापाऱ्यांच्या मागण्यावरून महापालिकेने राज्य शासनाला वस्तुस्थितीचा अहवाल पाठविला आहे. यावर राज्य शासन जो निर्णय घेईल, त्याच्या अधीन राहून कार्यवाही केली जाईल, असे पत्र उपायुक्तांनी दिले. शिवाय खासदार संजयकाका पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेण्याची आणि तोपर्यंत व्यापाऱ्यांवर कारवाई न करण्याची जबाबदारीही घेतली.