शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

कंपनी नियुक्तीला ‘स्थायी’ची स्थगिती

By admin | Published: December 10, 2015 12:03 AM

घनकचऱ्याचा प्रश्न : भटकी कुत्री, डुकरांवरून वादंग

सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार एजन्सी नियुक्तीचा विषय बुधवारी स्थायी समिती सभेत स्थगित ठेवण्यात आला. एजन्सीबाबत महासभेचे धोरण निश्चित नसल्याचे कारण देत स्थायी समितीने सपशेल माघार घेतली. आता १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेत घनकचऱ्याचा विषय चर्चेला येणार आहे. हरित न्यायालयाच्या देखरेखीखाली महापालिकेकडून घनकचरा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्तीचा विषय बुधवारी स्थायी समितीच्या अजेंड्यावर होता. महापौर विवेक कांबळे यांनी महासभेत घनकचरा प्रकल्पासाठी एजन्सी नियुक्त करू नये, असा ठराव केला होता. तो कायम असताना प्रशासनाने थेट एजन्सी नियुक्त करून त्याला मान्यता घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. याविषयी महासभेत कोणतेही धोरण निश्चित झालेले नाही. आयुक्तांकडून महासभेच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे स्थायी समितीत या विषयाला मान्यता मिळणार का? याची उत्सुकता होती. सभेत हारूण शिकलगार, शेडजी मोहिते या नगरसेवकांनी, एजन्सीची नियुक्ती हा धोरणात्मक निर्णय आहे. महासभेने धोरण निश्चित केलेले नाही. त्यामुळे हा विषय महासभेकडे पाठवावा, अशी मागणी करीत मंजुरीला आक्षेप घेतला. सभापती संतोष पाटील यांच्यासह सर्वच सदस्यांनी त्याला मान्यता दिली. त्यामुळे स्थायी समितीत हा विषय स्थगित ठेवण्यात आला. मोकाट जनावरे, भटकी कुत्री, डुकरे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा नगरसेवक राजू गवळी, अलका पवार, आशा शिंदे यांनी उपस्थित केला. शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. कचरा उठाव वेळेवर होत नाही. डेंग्यूची साथ पसरली आहे. कुत्री पकडण्यासाठी एकच व्हॅन आहे. सायंकाळी व पहाटेच्या सुमारास नागरिकांना कुत्र्यांचा त्रास होत आहे. पण या वेळेत कुत्री पकडली जात नाहीत, असा आरोपही केला. यावर सभापती पाटील यांनी, तीन शहरांसाठी स्वतंत्र डॉग व्हॅनची व्यवस्था करण्याबरोबरच कुत्री पकडण्याचे नियोजन सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)ठेकेदार व डुक्कर मालकांचे साटेलोटेराजू गवळी म्हणाले की, महापालिकेने डुकरे पकडण्याचा खासगी ठेका दिला आहे. ठेकेदार व डुक्कर मालकांत साटेलोटे झाले आहे. डुक्कर मालकाकडून आठवड्यातून एक डुक्कर ठेकेदाराला दिले जाते. या कामावरही पालिकेचे कर्मचारी नाहीत. ठेकेदाराकडून डुकरे पकडली जात नाहीत. त्यामुळे नवीन ठेकेदार नियुक्त करावा. येत्या आठ दिवसात निर्णय न झाल्यास महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.