शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

दिल्लीतील आंदोलनासाठी स्वाभीमानी एक्सप्रेस मिरजेतून रवाना-तीन जिल्ह्यातील १२५० कार्यकर्त्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:10 PM

शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा पूर्ववत ९.५ टक्के करावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसदेला घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील १२५० हून अधिक कार्यकर्ते विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना

ठळक मुद्देस्वाभीमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन- ३० रोजी संसदेला घेराव या विशेष रेल्वेस १८ डबे असून १५ बोगी, २ जनरल डबे, १ भोजनाची व्यवस्था असलेला डबा आहे.

शरद जाधव--सांगली- आॅनलाईन लोकमत

सांगली : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा पूर्ववत ९.५ टक्के करावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसदेला घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील १२५० हून अधिक कार्यकर्ते विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाले. शुक्रवार दि. ३० व शनिवार दि. १डिसेंबर रोजी दिल्लीतील संसदेला शेतकºयांकडून घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील २१० संघटनांचा सहभाग असून स्वाभीमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

बुधवारी सकाळी १० वाजता मिरज रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. या विशेष रेल्वेस १८ डबे असून १५ बोगी, २ जनरल डबे, १ भोजनाची व्यवस्था असलेला डबा आहे.  ‘स्वाभीमानी एक्सप्रेस’ नावाने असलेल्या विशेष रेल्वेला मिरज रेल्वेस्थानकावर सावकार मादनाईक यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.  यावेळी संदीप राजोबा, शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा अपराध, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, शिरोळच्या माजी पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील, वैभव कांबळे, आदीनाथ हिंगमिरे, विठ्ठल मोरे, सागर शंभूशेटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 राजू शेट्टी जिंदाबाद, स्वाभिमानी जिंदाबाद अशा घोषणांबरोबरच आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत अशा घोषणा देत उत्साही वातावरणात विशेष स्वतंत्र रेल्वेतून कार्यकर्ते व शेतकही संसदेकडे रवाना झाले. यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोषात हल्लगी वाजवित, झेंडे फडकावित, टाळ मृदुगांचा गजर करीत मिरजेतील रेल्वे स्थानकात प्रवेश केला. यामुळे संपूर्ण रेल्वे स्थनकातील अन्य प्रवाशांचे या आंदोलनाकडे लक्ष वेधले गेले. 

टॅग्स :StrikeसंपSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना