अंकलखोप : अंकलखोप (ता.पलुस) येथील उपसरपंचपदी स्वाती प्रताप पाटील यांची १२ विरुद्ध सहा मतांनी निवड झाली. विरोधी गटाचे उमेदवार भानुदास वसंतराव सूर्यवंशी यांचा पराभव झाला. सत्ताधारी काँग्रेस गटाचे १३ सदस्य व सरपंच अशी १४ मते असताना विरोधी भाजपा गटाने दोन मते फोडण्यात यश मिळविले. याबाबत काँग्रेसच्या नेते मंडळींनी भाषणात संताप व्यक्त केला.
ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी व सरपंच अनिल विभुते यांच्या अध्यक्षतेखाली गुप्त मतदान प्रक्रियेने ही निवड झाली. ग्रामविकास अधिकारी संग्राम सुतार यांनी विषय वाचन केले. निवडीनंतर झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी सरपंच विभुते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नूतन उपसरपंच पाटील व माजी उपसरपंच विनय पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.
स्वाती पाटील म्हणाल्या, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, ज्येष्ठ नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकासकामे करण्यासाठी सरपंच व सर्व सदस्यांच्या सहकार्याने कार्यरत राहीन.
यावेळी घनश्याम सूर्यवंशी, श्यामराव पाटील, विनय पाटील यांची भाषणे झाली. ज्येष्ठ नेते उदय पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, सोसायटी उपाध्यक्ष माणिकराव सूर्यवंशी, एम.के. चौगुले, पोलीस पाटील सुनीता सूर्यवंशी, ए.के. चौगुले, हणमंत पाटील, बाळासाहेब मगदूम, उदयसिंह सूर्यवंशी, तलाठी जयवंत सूर्यवंशी, रवि पाटील, विक्रम चौगुले, प्रा.प्रताप पाटील, प्रदीप पाटील, विकास गावडे आदी उपस्थित होते.
160721\img-20210715-wa0178.jpg
उपसरपंच अंकलखोप स्वातीपाटील