फोटो ओळ : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी नगरसेविका स्वाती टिंगरे यांनी अर्ज दाखल केला.
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवारी नगरसेविका स्वाती राजेंद्र टिंगरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यामुळे नगराध्यक्षपदी त्यांची निवड निश्चित झाली आहे.
नगराध्यक्ष तुषार मंडले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे. या पदासाठीची निवडणूक मंगळवार, दि. २७ रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारी मुदत होती. छाननी याचदिवशी होती.
सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी स्वाती टिंगरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. तो वैद्य ठरला. यामुळे नगराध्यक्षपदी त्यांची निवड निश्चित झाली आहे. अधिकृतपणे निवड मंगळवार, दि. २७ रोजी जाहीर होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी संतोष भोर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अश्विनी पाटील काम पाहत आहेत.