शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

स्वीस बँकेतील काळ्या पैशाशी संबंध नाही : विजयसिंहराजे पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:56 PM

सांगली : येथील पटवर्धन राजघराण्यातील कोणाचाही स्वीस बँकेतील काळ्या पैशाशी संबंध नाही. संबंधित प्रकरणात आयकर विभागाला खुलासा दिला असून, ...

सांगली : येथील पटवर्धन राजघराण्यातील कोणाचाही स्वीस बँकेतील काळ्या पैशाशी संबंध नाही. संबंधित प्रकरणात आयकर विभागाला खुलासा दिला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्टसुद्धा आहे, अशी माहिती विजयसिंहराजे पटवर्धन यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सांगलीच्या पटवर्धन परिवाराचा स्वीस बँकेलील काळ्या पैशाशी काहीही संबंध नाही. १९९१ ते २००४ पर्यंत आखाती देशात काम करीत असताना मिळविलेली कमाई कन्या मधुवंतीच्या नावे बक्षीसपत्र करून दिलेली आहे. भारतीय आयकर विभागाला याबाबत खुलासा दिला आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. आमच्या नावाने परदेशी बँकेत कोणतीही खाती नाहीत.१९९१ पासून अनेक वर्षे आखाती देशात मी काम करीत होतो. २00४ मध्ये कायमस्वरुपी भारतात परतलो. दरम्यान, आखाती देशात काम करताना मिळविलेली रक्कम, बचत आणि कामाबद्दलची येणेबाकी यासह सर्वांचे बक्षीसपत्र माझी कन्या मधुवंतीच्या नावाने केले आहे. ती सध्या अनिवासी भारतीय असून अमेरिकेतील शिकागो येथे वास्तव्यास आहे. काही वर्षांपूर्वी तिला आर्थिक संकटाचा सामना करवा लागला. परदेशात असताना आपल्या मुलीला आर्थिक अडचण भासू नये यासाठी आई-वडील म्हणून आम्ही तिच्या नावे बक्षीसपत्र करून दिले आहे. मधुवंतीला दिलेल्या बक्षीसपत्रातील सर्व गोष्टींबाबत तिने अमेरिकेतील आयकर विभागाच्या विवरणपत्रात तपशील दिला आहे. त्याचबरोबर आम्हीही भारतीय आयकर विभागाकडे तसा खुलासा केला आहे. त्यासोबत आम्ही आमचे अ‍ॅफिडेव्हीट आणि आम्हाला त्यावेळेस ज्यांनी मदत केली, त्या सर्वांची अ‍ॅफिडेव्हीट व संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे.सध्या परदेशात कोणतेही खाते नाहीपटवर्धन यांनी म्हटले आहे की, आता आमच्या नावाने परदेशात कोठेही कोणतीही खाती नाहीत आणि कोणताही काळा पैसा, धनही नाही. संबंधित प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे. भारतीय आयकर विभागाने आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. परदेशातील पैशाचे वृत्त खोटे आहे.