कडेगाव : तडसर येथे सुरू केलेले कोरोना केअर सेंटर अन्य गावांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांनी केले.
तडसर (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने लोकसहभागातून तात्या रावजी विद्यालयात ६ ऑक्सिजन बेडसह ४० बेडचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर’चे उद्घाटन तडसर उपकेंद्राच्या डॉ. अश्विनी सारूख, आरोग्यसेविका सौ. स्वाती गुजले यांच्याहस्ते केले. यावेळी प्रांताधिकारी मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, सरपंच हणमंतराव पवार, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे उपस्थित होते.
सरपंच पवार म्हणाले, निवासव्यवस्थेसह कोरोना रुग्णांना चहा, नाष्टा व पौष्टिक भोजन सुविधा देण्यात येत आहेत. वैद्यकीय पथकामार्फत नियमित आरोग्य तपासणी होत आहे. ग्रामस्थांनी आर्थिक तसेच वेगवेगळ्या स्वरूपात मदत दिली आहे.
ज्येष्ठ नेते व्यंकटराव पवार यांचेही मार्गदर्शन लाभले. यावेळी पवन पवार, समीर मुल्ला उपस्थित होते.
फोटो ओळ :
तडसर (ता. कडेगाव) येथील कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सरपंच हणमंत पवार.