लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शेतजमिनीच्या वहिवाटीवरून, हद्दीवरून बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण, धमकी देत दहशत निर्माण करणाऱ्या बुर्ली (ता. पलूस) येथील अशोक रानमाळे व राजाराम रानमाळे या दोघांच्या नऊ जणांच्या टोळीला तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतचे आदेश दिले.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये अशोक आण्णा रानमाळे (वय ५५), रणजित अशोक रानमाळे (२३), अभिजित माणिकराव पाटील (२८), रावसाहेब आण्णा रानमाळे (६२), विश्वजीत अशोक रानमाळे (२२, सर्व रा. बुर्ली) यांचा समावेश आहे तर दुसऱ्या टोळीत राजाराम कुंडलिक रानमाळे (वय ५५), गजानन तानाजी रानमाळे (४०), बबन मारूती रानमाळे (४८), अभिजित राजाराम रानमाळे (३५, सर्व रा. बुर्ली) यांचा समावेश आहे. या सर्वांना सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
अशोक रानमाळे व राजाराम रानमाळे टोळीवर शेतजमिनीच्या हद्दीवरून मारहाण, ठार मारण्याची धमकी देणे असे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तासगावच्या उपअधीक्षकांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल अधीक्षक गेडाम यांना सादर केला होता.
अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, सतीश माने यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.