शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आता वाघांची डरकाळी; ताडोबातील ८ वाघ येणार कोयना, चांदोलीत

By संतोष भिसे | Published: October 13, 2023 12:13 PM

वन विभागाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात

संतोष भिसे

सांगली : विदर्भातील ताडोबा, चंद्रपुरातील वाघ सह्याद्री डोंगररांगात सोडण्यात येणार आहेत. त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे चांदोली, कोयनेच्या जंगल प्रक्षेत्रात व कडेकपाऱ्यात आता बिबट्यांच्या जोडीने वाघोबांचाही संचार होणार आहे.वाघांच्या स्थलांतरासाठी वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, ताडोबामध्ये वाघांची संख्या खूपच वाढल्याने जंगलातून लगतच्या निवासी वस्त्यांमध्ये, गावांमध्ये येत आहेत. अन्नासाठी शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना भक्ष्य करत आहेत. त्यामुळे वाघांची संख्या कमी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे.त्यानुसार ताडोबातील दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आले. आणखी आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना, चांदोलीच्या जंगलात व डोंगररांगात आता वाघांचीही भटकंती आढळणार आहे.

चांदोली, कायनेत सध्या सात वाघयावर्षी झालेल्या प्राणी गणनेत कोयना व चांदोलीच्या जंगल परिसरात सात वाघ असल्याचे आढळले आहे. वन विभागाच्या कॅमेऱ्यात त्यांची छबी टिपली गेली असून, वाघांची अधिकृत संख्या जाहीर करण्यात आली आहे. तथापि, हे वाघ स्थायी स्वरूपाचे नाहीत. सह्याद्रीच्या कॅरीडॉरमध्ये फिरत राहणारे आहेत. दांडेली-म्हादई-गोवा-दोडामार्ग-चंदगड-राधानगरी-चांदोली-कोयना हे त्यांचे भ्रमण क्षेत्र आहे.

चांदोलीमध्ये वाघांसाठी वातावरण निर्मितीसह्याद्रीच्या खोऱ्यात वाघ सोडण्याच्या प्रस्तावानंतर वन विभागाने काही वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. चांदोलीमध्ये झोळंबी पठारावर सुमारे १० हेक्टर क्षेत्रात गवताळ कुरण विकसित करण्यात आले आहे. तेथे हरण, सांबर, आदी तृणभक्षी प्राण्यांची पैदास सुरू आहे. त्यांची वाढ झाल्यानंतर जंगलात सोडून दिले जाते. या माध्यमातून वाघांसाठी अन्न उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. वाघ हा गवताळ परिसरात राहणारा व तृणभक्षी प्राण्यांना भक्ष्य करणारा प्राणी असल्याने ही तयारी सुरू आहे.

विदर्भातून सह्याद्री खोऱ्यात वाघांच्या स्थलांतरासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दिला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. - स्नेहलता पाटील, विभागीय वन अधिकारी.

टॅग्स :SangliसांगलीTigerवाघ