तासगाव तालुक्यातील गौण खनिज चोरीला तहसीलदार व प्रांताधिकारी याचे अभय आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही जाणीवपूर्वक गौण खनिज चोरीचे पंचनामे प्रांताधिकारी करीत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी व संबंधित मंत्री महोदय यांचे लक्ष वेधावे यासाठीच मंत्रालयावरून उडी घेणार असल्याचे केदार यांनी सांगितले आहे.
तासगाव तालुक्यातील खडी क्रशर कंपनी व मुरूम ठेकेदार यांनी तालुका महसूल प्रशासनाला हाताशी धरून शासनाचा महसूल बडवत मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने गौण खनिज उत्खनन केले आहे.
या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यातील अवैध मार्गाने झालेल्या गौण खनिज चोरीला जबाबदार तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई, अन्यथा न्याय मागणीसाठी मंत्रालयावरून उडी घेणार असल्याचे केदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.