शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

उपसा बंदीतही उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Published: April 25, 2016 11:34 PM

शिवाजीराव नाईक : शिराळ्यात ऊर्जा मित्र बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; पैसे घेणाऱ्या लाईनमनची बदली करा

शिराळा : थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आमिषाच्या जोरावर मदत करणाऱ्या लाईनमनवर कारवाई करावी, तसेच ऊर्जा मित्र बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अ‍ॅक्युरेट इलेक्ट्रीकल कंपनीला नोटीस काढावी, असे आदेश आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिले. येथे झालेल्या ऊर्जा मित्र बैठकीत ते बोलत होते. आमदार नाईक म्हणाले, सध्या कधी नव्हे ती पाणीटंचाई शिराळा तालुक्यात आहे. वीज वितरण कंपनीकडून थकित रक्कम असणाऱ्या शेतकऱ्यांना कारवाईची भीती दाखवून आर्थिक आमिषाच्या जोरावर त्यांना बंदी असतानाही पाणी उपसा करुन देत आहेत. अशा शेतकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या लाईनमनची ताबडतोब बदली करुन कारवाई करावी. शिराळा व वाळवा तालुक्यातील अनेक कामांचे ठेके अ‍ॅक्युरेट इलेक्ट्रीकल कंपनीने घेतले आहेत. मात्र त्यांच्याकडून वेळेत काम होत नाही. त्याचबरोबर त्यांचा एकही कर्मचारी कोणत्याही ऊर्जा मित्र बैठकीस उपस्थित राहिलेला नाही. त्यांना वीज वितरण कंपनीने नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करावी.आमदार नाईक म्हणाले, येळापूर परिसरातील लोकांची सिंगल फेजची मागणी मोठी आहे. त्यामुळे येथील कामे तात्काळ करावीत. निगडी येथील बाळकू साळुंखे यांचे १९९८ पासून मंजुरीसाठी थांबलेले घरगुती कनेक्शन ताबडतोब द्यावे. वाडीभागाई व मेणी येथील जळीतग्रस्तांना एका महिन्यात भरपाई द्यावी. बिळाशी सब स्टेशनसाठी जमीन दिलेल्या मालकांना लवकर भरपाई द्यावी. जादा आकारणी झालेल्या बिलाचा परतावा द्यावा. थकितांना सोयीचे हप्ते पाडून द्यावेत आणि शेती पंपांना लवकरात लवकर मीटर बसविण्याची कार्यवाही सुरु ठेवावी, अशा त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यामध्ये दिरंगाई झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.यावेळी मागील बैठकीतील ३७ प्रकरणे मार्गी लागल्याचे सांगून, या बैठकीतील आलेल्या ३६ अर्जांवर चर्चा करुन ती पुढील कार्यवाहीसाठी वितरण विभागाकडे देण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, माजी उपसभापती विजय कांबळे, संजय बेंगडे, आबा सुतार, विजय शिरसठ, कार्यकारी अभियंता यु. एस. शेख, उपकार्यकारी अभियंता सपाटे, सु. वा. कोकणे, कनिष्ठ अभियंता च. बि. जाधव, शि. वा. देशमाने, एस. एस. गुंजले, शा. का. पेठ, आर. वाय. माने, वाय. व्ही. मालवणकर, डी. एस. काठाळे, सी. आर. बेंद्रे, एस. एस. गायकवाड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)