शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचे बर्गे न काढणाऱ्यांवर कारवाई करा, महापूर नियंत्रण समितीची मागणी 

By अशोक डोंबाळे | Published: June 14, 2024 1:59 PM

..तर महापुरास पाटबंधारे विभाग जबाबदार

सांगली : सांगलीत कृष्णा नदीवरील बंधाऱ्यातील बर्गे पावसाळा सुरू होण्यापूर्वी काढणे गरजेचे होते. पण, त्याकडे सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सांगलीत महापूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. नियमानुसार बर्गे काढण्याचे काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली. यावेळी महापूर नियंत्रण समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले की, एक जूनपूर्वी कृष्णा नदीसह सर्व नद्यावरील बंधाऱ्यातील बर्गे काढून टाकावेत असा नियम आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. बंधाऱ्यात गाळही साठून राहात नाही. सांगलीतही असे बर्गेपूर्वी काढले जात होते. बर्गे काढल्यामुळे महापुराचा धोका कमी होतो असे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे समितीतर्फे वारंवार बर्गे काढण्याबाबत मागणी करूनही यावर्षी पुन्हा बर्गे काढण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली आहे. महापुराचा धोका त्यामुळे वाढणार आहे. आम्ही नुकताच अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्याचा पाहणी दौरा केला. त्यावेळी कर्नाटकातील अधिकाऱ्यांना आम्ही हिप्परगी बंधाऱ्यातील बर्गे काढण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी तातडीने बँरेज दरवाजे वर केले आहेत. आम्ही समक्ष येताना पाहिले. कर्नाटकातील अधिकारी विनंतीनुसार लगेच कार्यवाही करतात आणि सांगलीतील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय मात्र काम करण्यास टाळाटाळ का करत आहे.पाटबंधारे विभागात नुकताच पूर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. परंतु पूर नियंत्रणातील ज्या उपाययोजना आहेत, त्या करण्याबाबत जर चालढकल झाली तर त्या पूर्ण नियंत्रण कक्षाचा उपयोग काय, असाही सवाल सर्जेराव पाटील यांनी केला. बर्गे काढण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली...तर महापुरास पाटबंधारे विभाग जबाबदारयंदा पावसाचा जोर अधिक दिसत आहे. अशावेळी बंधाऱ्यातील बर्गे न काढल्यामुळे जर महापुराचा धोका वाढला तर त्याला सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय जबाबदार राहील, असा इशारा सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूरcollectorजिल्हाधिकारी