शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

लाडक्या 'टॉमी'लाही न्या 'राणी चेन्नम्मा' एक्स्प्रेसमधून, श्वानासाठी जनरल तिकिटाची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 4:25 PM

सांगली : सांगली रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये आता वातानुकूलित डब्यात चार फॅमिली केबिन्स उपलब्ध झाल्या असून, कोणत्याही ...

सांगली : सांगलीरेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये आता वातानुकूलित डब्यात चार फॅमिली केबिन्स उपलब्ध झाल्या असून, कोणत्याही कुटुंबाला आता त्यांच्या लाडक्या टॉमीसह किंवा अन्य पाळीव प्राण्यासह प्रवास करता येऊ शकतो.एसी फर्स्ट क्लास डब्यामध्ये सांगली स्थानकापासून चार फॅमिली केबिन्स उपलब्ध असून, एका केबिनमध्ये चार व्यक्ती प्रवास करू शकतात. याच डब्यामध्ये सांगली स्थानकावरून जोडप्यांसाठी चार कुपे केबिन उपलब्ध आहेत. एका कुपेमध्ये दोन प्रवासी प्रवास करू शकतात. प्रत्येक केबिन व कुपेमध्ये आपले पाळीव प्राणी म्हणजेच कुत्रा, मांजर, पक्षी घेऊन जाता येते. त्यासाठी गाडी सुटण्याच्या दोन तास आधी सांगली स्थानकावरून स्टेशन मास्तरांना कळवून परवानगी घेऊन प्रवास करावा लागेल.राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या माध्यमातून सांगलीतील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. सांगली स्थानकावरून सुटणारी ही पहिली एक्स्प्रेस ठरली आहे. त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न या गाडीला मिळत असल्याने ती कायम सुरू राहणार आहे. या गाडीसाठी तिकिटांची उपलब्धता तसेच एसी, स्लीपर कोच गाड्यांसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यातच आता पाळीव प्राण्यांसहित प्रवास करण्याची सोयही झाली आहे.

केबिन लॉक करून प्रवासफॅमिली केबिन लाॅक करून सांगली स्टेशन ते बंगळुरू, हुबळी, दावणगिरी आदी ठिकाणी सुरक्षित प्रवास करता येतो. एसी फर्स्ट क्लास केबिनमध्ये विमानाप्रमाणे सहायकाला बोलावण्यासाठी बेलचे बटणही दिले आहे.

लॉजिंगचा खर्च वाचणारएसी फर्स्ट क्लास कोचमध्ये आंघोळीसाठी बाथरूम व गरम पाण्यासाठी गिझरची सोय आहे. त्यामुळे सांगलीतून कामानिमित बंगळुरूला जाणाऱ्या लोकांना एसी फर्स्ट क्लासमध्ये आंघोळ करून कपडे बदलून सकाळी बंगळुरूला उतरता येईल. दिवसभर बंगळुरूमध्ये काम आटोपून रात्री ११ वाजता बंगळुरू-सांगली राणी चेनम्मा एक्स्प्रेस पकडून परतता येणार आहे. या काळात त्यांचा लॉजिंगचा खर्च यामुळे वाचणार आहे.

अनेकदा कुटुंबासह प्रवास करताना आपल्या पाळीव प्राण्यांना कोणाकडे तरी सोडून जावे लागते. प्रवाशांना आता त्यांना सोबत घेऊन प्रवास करता येईल. त्यामुळे राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या या केबिन्सचा उपयोग होणार आहे. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. - उमेश शहा, सदस्य, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेdogकुत्रा