विशाल तिरमारे म्हणाले, पलूस तालुक्यात अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पोलिसांचे भय राहिलेले नाही. खुलेआम पलूस, कुंडल, भिलवडी पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात देशी दारू, मटका, जुगार चालू आहे. रात्री चारचाकी गाडीमधून देशी दारूची विक्री केली जाते. पोलिसांची नजर चुकवून हे धंदे जोमात चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. तालुक्यातील नागरिकांची कुटुंबे उदध्वस्त होत आहेत. पोलीस प्रशासनाने खाकीचा धाक दाखवून अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन पक्ष पलूसमध्ये तीव्र आंदोलन करेल.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष शीतल मोरे, मुस्लिम आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमजान मुजावर, आरपीआय मुस्लिम आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष सलमान पठाण, विद्यार्थी आघाडी पलूसचे अध्यक्ष प्रसाद शिखरे, युवक पलूस तालुका उपाध्यक्ष किशोर मोहिते, दुधोंडी शाखा अध्यक्ष वैभव तिरमारे, भीमशक्ती ग्रुप अध्यक्ष अक्षय तिरमारे, शाहरुख पठाण, तोफिक मुलानी, विजय कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो १८पलूस/ओळी : पलूस तालुक्यातील अवैध धंदे बंद करा, या मागणीचे निवेदन आरपीआयतर्फे तहसीलदारांना विशाल तिरमारे, शीतल मोरे, रमजान मुजावर, सलमान पठाण, वैभव तिरमारे आदींनी दिले.