सांगली : ग्रामीण दुर्गम भागामध्ये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची प्रॅक्टीस सुरू असण्याची शक्यता असून अशा ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तपासण्या कराव्यात. तसेच अशा व्यावसायिकांविरूध्द आलेल्या तक्रारींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिल्या.बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूध्द कारवाई करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक अंकुश इंगळे, अशासकीय सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील, सुरेश भोसले़ यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी, प्रतिनिधी व समितीचे अन्य शासकीय, अशासकीय सदस्य उपस्थित होते.रूग्णाची फसवणूक होवू नये यासाठी मेडिकल कौन्सिलच्या नोंदणी प्रमाणपत्रातील पदवीचा उल्लेख वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांनी फलकावर, औषधाच्या चिठ्ठीवर करणे आवश्यक आहे. याबाबत वैद्यकीय व्यावसायिकांना सूचित करून त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी. याबाबत तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतंत्ररीत्या सर्वेक्षण करावे, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिल्या.यावेळी त्यांनी बोगस व्यावसायिकांविरूध्द आलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन तात्काळ कारवाई करावी. त्यांच्याकडील विना परवाना वापरण्यात येणारा औषधसाठा जप्त करून त्याची शहानिशा करावी व अशा प्रकरणी कठोर कारवाई करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती देणाऱ्यास बक्षीस याबाबत सर्व आरोग्य यंत्रणांनी दर्शनी भागात फलक लावून जनजागृती करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूध्दच्या तक्रारींवर तात्काळ कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:45 AM
ग्रामीण दुर्गम भागामध्ये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची प्रॅक्टीस सुरू असण्याची शक्यता असून अशा ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तपासण्या कराव्यात. तसेच अशा व्यावसायिकांविरूध्द आलेल्या तक्रारींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिल्या.
ठळक मुद्देबोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूध्दच्या तक्रारींवर तात्काळ कठोर कारवाई करासांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिल्या सूचना