माडग्याळ
: जत तालुक्यात कोरोना साथीची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची गरज असल्याचे मत केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी व्यक्त केले आहे.
टोणेवाडी, येळवी, खैराव व कुणीकोणूर आदी गावात जमदाडे यांनी स्वखर्चातून जंतुनाशक औषधाची फवारणीचा उपक्रम राबविला. यावेळी ते बोलत होते. जमदाडे म्हणाले की, तालुक्याला कोणीही वाली नाही. शासकीय ग्रामीण रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही व्हेंटिलेटरची सोय नाही. जाणीवपूर्वक आम्हाला नियोजनातून डावलल्याचा आरोप जमदाडे यांनी केला.
यावेळी खैरावचे सरपंच राजाराम गुटुगडे, टोणेवाडीचे सरपंच कमल घोडके, कुणीकोणूरचे सरपंच लक्ष्मण पाटील, मच्छिंद्र खिलारे, संजय कांबळे आदी उपस्थित होते. फवारणीसाठी अभय जमदाडे, प्रमोद जमदाडे, प्रसाद जमदाडे, प्रशांत जमदाडे, योगेश भोसले, सुमित कोडग यांनी परिश्रम घेतले.