शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सांगली- रामापूरचा तलाठी लाचलूचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 4:48 PM

सात बारा वरील इ करारची  नोंद कमी करण्यासाठी ४  हजार ५००  रुपयांची लाच घेताना रामापूर तालुका कडेगाव येथील तलाठी सुरेश सुखदेव रुपनर (वय -५१ ) या लाचखोर तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक

ठळक मुद्देयाप्रकरणी आरोपी सुरेश सुखदेव रुपनर याचे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली चिंचणी (वांगी ) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला

सांगली : सात बारा वरील इ करारची  नोंद कमी करण्यासाठी ४  हजार ५००  रुपयांची लाच घेताना रामापूर तालुका कडेगाव येथील तलाठी सुरेश सुखदेव रुपनर (वय -५१ ) या लाचखोर तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले            या तलाठ्याने रामापूर येथील एका शेतकऱ्याच्या सात - बारा उतारावरील इ कराराची नोंद कमी करण्यासाठी  ५ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबधीत शेतकऱ्याने रविवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकड तक्रार दिली होती .                यानंतर  लाच लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाने सोमवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी  सापळा लावला होता . यावेळी तक्रारदार शेतकरी यांचेकडुन  तलाठी सुरेश रुपनर याने ४ हजार ५०० रुपयांची  लाच  स्वीकारताच सापळा रचून बसलेल्या एसीबीच्या पथकाने रुपनर रंगेहात पकडले व अटक केली.          

 याप्रकरणी आरोपी सुरेश सुखदेव रुपनर याचे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली चिंचणी (वांगी ) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही कारवाई पोलीस उप आयुक्त संदीप दिवाण ,राजकुमार गायकवाड अप्पर पोलीस उप आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र तेंडुलकर पोलीस उप अधिक्षक , अविनाश सागर ,संजय कलकुटगी ,राधिका माने ,जितेंद्र काळे ,संजय संकपाळ ,भास्कर भोरे ,बाळासाहेब पवार  यांनी केली आहे .

टॅग्स :MONEYपैसाCrime Newsगुन्हेगारी