अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवरून दोन राज्यांतील वाद पेटला असून या वादादरम्यान आता शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी उडी मारली आहे. आज आपल्या समाजावर दुर्देवाने अभिनेते आणि अभिनेत्र्यांचा प्रभाव आहे. आपला समाज या अभिनेत्यांचा आदर्श घेतो. या नटनट्यांची लायकी काय आहे? त्यांची पात्रता काय? उंची किती तरीही १ अब्ज ३५ कोटी जनता त्यांना आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून स्वीकारतात. याचा अर्थ या देशाचं लवकरच वाटोळं होणार हे निश्चित आहे. त्याचंच हे निदर्शक आहे. सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे. त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा चूक आहे, त्यामुळं या विषयावर बोलायला नको, अशी टीका संभाजी भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केलेले वक्तव्य योग्य नसून ते पाप आहे. महाभारतात आपल्याच नातेवाईकांविरुद्ध लढताना अर्जून जसा गोंधळला होता तशी या दोन्ही नेत्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका देखील यावेळी भिडे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, ते म्हणाले की, उद्धव ठाकरे व शरद पवार दोन्ही नेते वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या वतीने राम मंदिराच्या भूमिपूजनास उपस्थित रहावे. उद्धव ठाकरे यांनी आॅनलाईन पद्धतीने सोहळा करण्याची केलेली मागणी बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात आवडली नसती.शिवसेनेचे योगदान महत्वाचे शिवसेना ही हिंदू धर्मरक्षणासाठी आवश्यक आहे. शिवसेनेचे यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जायला हवे. राज्यभरातही दौरा करून ठाकरे यांनी कोरोनाबद्दलची लोकांमधील भीती दूर करावी.
राममंदिर भूमिपूजन सोहळा दिवाळी सारखा साजरा करावा कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. सूरक्षित अंतराचा नियम तसेच लॉकडाऊनसारखे प्रकार खच्चीकरण करणारे आहेत. त्यामुळे राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिवाळीसारखा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा
थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या