बागणी : काकाचीवाडी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तानाजी घोरपडे यांची बिनविरोध निवड झाली.
सुवर्णा माळी यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त होते. हे रिक्त पद भरण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये एकमेव अर्ज आल्याने तानाजी घोरपडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीसाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हजर होते. सरपंच प्रमोद माने यांच्या अध्यक्षतेच्या खाली ही निवड करण्यात आली. शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेविका सुरेखा माने यांनी काम पाहीले.
यावेळी तानाजी घोरपडे म्हणाले की, काकाचीवाडीच्या विकासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करू. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अझरुद्दीन महाब्री, कमल डाळे, कमल मालेकर, सुवर्णा माळी, परवीन महाब्री, उषा गावडे, शिवाजी क्षीरसागर, माजी उपसरपंच आनंदराव डाळे, मधुकर माळी, काकाचीवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी ढोले, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप कोळी, विपुल खुडे, मौला महाब्री, मनोज मालेकर, सुरेश मालेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
फाेटाे : ०७ तानाजी घाेरपडे