शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

Sangli: ‘टार्गेट’ ८५ कोटीचे, वसुली ५० कोटीची, सांगली महापालिकेसमोर करवसुलीचे आव्हान,घरपट्टी विभागाची दमछाक

By शीतल पाटील | Published: March 01, 2023 9:20 PM

Sangli Municipal Corporation

- शीतल पाटील सांगली : महापालिकेकडील घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करांच्या वसुलीचे मोठे आव्हान आहे. करवसुलीसाठी आता एकच महिना बाकी आहे. आतापर्यंत घरपट्टी विभागाने ५० कोटीची वसुली करीत निम्मा पल्ला गाठला आहे. आयुक्तांनी ८० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार किमान ८५ कोटी रुपयांची वसुली अपेक्षित आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे.

कोरोना, महापुरामुळे दोन ते तीन वर्षे महापालिकेने करवसुलीबाबत नरमाईची भूमिका घेतली होती. त्यामुळे थकबाकीचा आकडा वाढला आहे. घरपट्टी विभागाची चालू मागणी व थकबाकी दरवर्षी ७० ते ७२ कोटीच्या आसपास होती. पण आता ती ११० कोटीपर्यंत पोहोचली आहे. पाणीपट्टीच्या कराची अवस्थाही तशीच आहे. त्यामुळे यंदा आयुक्त सुनील पवार यांनी सर्वच विभागाला करवसुलीचे उद्दिष्ट निर्धारित करून दिले आहे. त्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार थांबविण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य विभागातील कर्मचारी सुट्टी दिवशीही करवसुलीसाठी दारोदारी फिरत आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा घरपट्टी विभागाने वसुलीत आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर ४९ कोटी ८१ लाख रुपयांची वसुली झाली होती. फेब्रुवारीअखेरपर्यंत ४९ कोटी ४० लाख रुपयांची वसुली केली आहे. अजून एक महिना शिल्लक आहे. या महिन्यात ३५ कोटी रुपये वसुलीचे आव्हान घरपट्टी विभागासमोर आहे. थकबाकी वसुलीसाठी घरपट्टी विभागाने जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. शिवाय पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाईही हाती घेतली आहे.

उपयोगकर्ता करातून साडेसात कोटीउपयोगकर्ता करातून घरपट्टी विभागाला ७ कोटी ६१ लाख रुपये मिळाले आहेत. गतवर्षी या करातून ७ कोटी २० लाख तर २०२०-२१ मध्ये ७ कोटी ५६ लाखांची वसुली झाली होती.

घरपट्टीची वसुली२०२०-२१ : ५२.३६ कोटी२०२१-२२ : ४९.८१ कोटी२०२२-२३ : ४९.४० कोटी (फेब्रुवारीअखेर)

टॅग्स :Sangliसांगली