शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
4
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
5
किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
6
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
7
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
8
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
9
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
10
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
11
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
12
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
13
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
14
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
15
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
16
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
17
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
18
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
19
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
20
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले

टॅरिफचे ढग सांगलीच्या वेशीवर, १५०० कोटींची निर्यात प्रभावित होणार

By संतोष भिसे | Updated: April 21, 2025 15:36 IST

२६ टक्के दर कमी करण्याचे अमेरिकन उद्योजकांचे आवाहन

संतोष भिसेसांगली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ टॅक्सचे काळे ढग सांगली, मिरजेच्या वेशीवरही येऊन धडकले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातून होणारी सुमारे १५०० कोटी रुपयांची औद्योगिक निर्यात मंदावण्याची भीती आहे.ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ जाहीर केले आहे. याचा फटका प्रामुख्याने औद्योगिक उत्पादनांना बसणार आहे. जिल्ह्यातील उद्योगांकडून अमेरिकेला वर्षाकाठी सुमारे १२०० ते १५०० कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात केली जाते. ट्रम्प यांच्या निर्णयानुसार त्यांना २६ टक्के अतिरिक्त कर लागणार आहे. साहजिकच अमेरिकेत त्यांच्या किमती २६ टक्क्यांनी वाढणार आहेत. या वाढीव किमतीला उत्पादने स्वीकारण्यास अमेरिकन आयातदार तयार नाहीत.भारतातील उद्योजकांनी आपल्या उत्पादनांच्या किमती २६ टक्क्यांनी कमी कराव्यात, जेणेकरून अमेरिकेतील उत्पादने आहे त्याच किमतीला विकता येतील’, असाही प्रस्ताव अमेरिकेतील उद्योजकांनी दिला आहे. उत्पादनामध्ये नफ्याचे मार्जिन इतके मोठे नसल्याने येथील उद्योजकांमध्ये अस्वस्थता आहे.

संकट तूर्त टळले

हे व्यापारयुद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांनी टॅरिफच्या अंमलबजावणीला ९० दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे संकट तूर्त टळले आहे.

सांगलीतून अमेरिकेला..सांगली जिल्ह्यातून अमेरिकेला औद्योगिक आणि कृषी उत्पादने निर्यात होतात. औद्योगिक उत्पादनांमध्ये वाहनांचे सुटे भाग, रसायने, टेक्सटाइल्स्, विद्युत पंप व व्हॉल्व्ह, तेल आणि गॅस उत्पादनांशी संबंधित उपकरणांचा समावेश आहे.

ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ टॅक्समधून भारताला सवलत मिळेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर वाटाघाटी सुरू असून, आम्हा उद्योजकांचे लक्ष त्याकडे लागले आहे. निर्यात तूर्त थांबलेली नाही, पण या व्यापारयुद्धातून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. - संजय अराणके, संचालक, सांगली-मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन

टॅग्स :SangliसांगलीAmericaअमेरिका