शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

तरुण मराठा’ला पीएनजी कबड्डी चषक ‘जय मातृभूमी’ला उपविजेतेपद ; ‘राणाप्रताप’ तिसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:17 AM

हरिपूर : पीएनजी चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सांगलीवाडीच्या तरुण मराठा मंडळाने धडाकेबाज खेळ

ठळक मुद्देखेळाडूंची मोठ्याप्रमाणात गर्दी

हरिपूर : पीएनजी चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सांगलीवाडीच्या तरुण मराठा मंडळाने धडाकेबाज खेळ करीत रोख रक्कम २५ हजाराच्या बक्षिसासह विजेतेपद पटकावले.तरुण मराठा मंडळ विरुध्द जय मातृभूमी मंडळ यांच्यात अंतिम सामना झाला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने ही लढत रंगतदार झाली. अनुभवी जय मातृभूमी मंडळाने ‘तरुण भारत’ची बचाव फळी खिळखिळी केली. यापूर्वीच्या स्पर्धेत जय मातृभूमीने तरुण मराठाला नमवले होते. पराभवाचा ‘तो’ वचपा काढण्यासाठी या स्पर्धेत ‘तरुण मराठा’चा संघ चुरशीने आणि ईर्षेने लढला. ‘तरुण मराठा’ने बेधडक चढायांच्या जोरावर जय मातृभूमीला २३-१२ अशा ११ गुणांनी पराभूत करत पीएनजी चषकावर आपले नाव कोरले. ‘तरुण मराठा’कडून विलास पाटील, शुभम पाटील व संदीप यादव यांनी नेत्रदीपक खेळ केला.या स्पर्धा पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ यांनी पुरस्कृत केल्या असून, पीएनजी सुवर्ण कारागीरांनी आयोजित केल्या होत्या. आयर्विन पुलाजवळील सरकारी घाट येथे विद्युतझोतात हे सामने पार पडले. बक्षीस वितरण जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संयोजक समीर गाडगीळ होते. नितीन शिंदे यांनी स्वागत केले. विजय कडणे व डॉ. सुहास व्हटकर यांनी सूत्रसंचालन केले.आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, माजी नगरसेवक हरिदास पाटील, आंतरराष्ट्रीय पंच रामकृष्ण चितळे यांनी स्पर्धास्थळी सदिच्छा भेट दिली. पंच म्हणून अनिल माने, भालचंद्र जाधव, आलम मुजावर, सुशील गायकवाड, झाकीर इनामदार, विजय देसाई, रवींद्र कोरे, गणेश भस्मे, धनाजी शिंदे, अखिलेश पाटील, शिवाजी पाटील यांनी काम पाहिले. यावेळी राजू गाडगीळ, विकास कारेकर, मंगेश मुधोळकर, विकास कामटे, गोपी कडणे, सुशांत भुर्के, दत्ताजी गायकवाड आदी उपस्थित होते.विजेतेपदाचा पीएनजी कबड्डी चषक सांगलीवाडीच्या तरुण मराठा मंडळास रामभाऊ घोडके व समीर गाडगीळ यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नितीन शिंदे, राजू गाडगीळ, हरिदास पाटील, सुहास व्हटकर, अशोक शेट्टी, वेदांत गाडगीळ, राजन खेडेकर, विकास कारेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीSportsक्रीडा